
आयआरसीटीसी अयोध्या, वाराणसी आणि प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांसाठी खास पॅकेजचं आयोजन केलं आहे. 30 मार्च रामनवमी असल्याने हे धार्मिक पॅकेज त्या दृष्टीने आखलं आहे.

अयोध्येचा प्रवास 29 मार्चला इंदुरमधून सुरु होईल. महाकाल एक्स्प्रेसच्या माध्यमातून तीन ठिकाणी जाता येईल. ट्रेन इंदुर स्टेशनवरुन 29 मार्चला रात्री 10 वाजून 15 सुटेल. त्यानंतर सकाळी 5 वाजल्यापासून वाराणसी टूर सुरु होईल.

या पॅकेजसाठी 13650 रुपये मोजावे लागतील. वाराणसीत भाविकांना सारनाथ आणि काशी विश्वनाथाचं दर्शन घेता येईल. त्यानंतर रात्री आराम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रयागराजला रवाना होईल. येथे भाविक संगम आणि अयोध्येतील रामजन्मभूमीसह हनुमान गढीचं दर्शन घेऊ शकतील.

हे धार्मिक टूर पॅकेज 6 दिवस आणि 5 रात्रींचं असेल. आयआरसीटीसी या टूर पॅकेजमध्ये प्रवाशांना 3 ब्रेकफास्ट आणि 3 डिनर दिले जातील. प्रवाशांना 3 एसीतून प्रवास करता येईल.

प्रवाशांना तीन दिवस डिलक्स हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा असेल. अयोध्या, प्रयागराज आणि काशी फिरण्याऱ्यांसाठी हे उत्तम पॅकेज आहे