
आपण अनेक पुरुष बॉडी बिल्डर पाहिले असतील. अनेक तरुणांची बॉडी पाहून तरुणी पिघळताना दिसतातच. पण तुम्ही कधी मुलीला बॉडी बिल्डिंग करताना पाहिलं आहे का? जर नसेल पाहिलं तर आता एका अशा तरुणीचा फोटो व्हायरल होतोय जिची बॉडी बघून तुम्ही नक्कीच चकीत व्हाल. या बॉडी बिल्डर तरुणीने सांगितलं आहे की तिची बॉडी बघून सगळे पुरुष तिच्या बॉडीच्या प्रेमात पडतात.

सध्या जेसीका ही एक पर्सनल फिटनेस ट्रेनर आहे सोबतच ती इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ बॉडी बिल्डिंग आणि फिटनेस व्यावसायिक आहे.

जेसिकाची बॉडी पाहून सर्व तरुण तर घायाळ झालेलेच आहेत. सोबतच तिचा चाहता वर्गही लाखोंच्या संख्येत आहे. त्यामुळे जेसीकाने तिच्या हजारो फॉलवर्ससोबत एक Only फॅन पेज देखील बनवलं आहे.

जेसिकानं डेली स्टार शी बोलताना सांगितलं की, मला असं आढळलं की भरपूर लोक माझ्या बॉडी बिल्डींगवर प्रेम करतात त्याचं कौतुक करतात. तसंच स्पेशल कंटेंटसाठी ते मला पैसे देखील देतात. त्यामुळे जेसीका नेहमी इंस्टाग्रामवर तिचे वर्कआउट, आर्म रेसलिंग, फ्लेक्सिंगचे व्हिडीओ अपलोड करत असते.

एखाद्या पुरुषाला दुसर्या व्यक्तींच्या बॉडीची प्रशंसा करायला आवडते. तर बहुतेक पुरुषांना एक मजबूत स्त्री आवडत असते. पण बरीच मुले ही महिला बॉडीबिल्डर्सवर असलेलं त्यांचं प्रेम कोणालाही सांगत नाहीत.