ऐकावं ते नवलंच! नऊ बायकांशी लग्न आणि आता सहा जणींसोबत एकत्र झोपण्यासाठी त्यानं केलं असं काम

| Updated on: Apr 28, 2023 | 1:05 PM

नवरा बायको म्हंटलं की राग रुसवा, फुगवा आलंच. पण एका व्यक्तीने तब्बल 9 महिलांशी लग्न केलं. त्यापैकी 3 जणांसोबत घटस्फोट झाला. आता 6 बायकांना खूश ठेवण्यासाठी त्याने एक शक्कल लढवली आहे.

1 / 6
ब्राझीलमधील मॉडेल आणि सोशल मीडिया इंफ्लूएंसर आर्थर ओउर्सो पुन्हा एकदा चर्चेत आहे. लैगिंक स्वातंत्र्य आणि लग्नाच्या प्रथेविरोधात 9 जणींशी लग्न करत लक्ष वेधलं होतं.

2 / 6
ब्राझीलमधील साओ पाउलो इथल्या 37 वर्षीय आर्थर ओउर्सोने 2021 साली एकूण 9 लग्न केली. आता त्यापैकी तीन जणींसोबत घटस्फोट झाला आहे. तर सहा जणांसोबत मजेत राहात आहे.

3 / 6
आर्थरला 21 ते 51 या वयोगटातील सहा बायका आहेत. लुआना काझाकी, एमिली सौझा, वाल्क्विरिया सँटोस, ओलिंडा मारिया, डमियाना आणि अमांडा अल्कुकर्क अशी त्यांची नावं आहेत.

4 / 6
आता सहा बायकांना खूश करण्यासाठी त्याने एक मोठा बेड तयार केला आहे. यासाठी त्याने 81 लाख रुपये खर्च केले आहेत.

5 / 6
बेड अपुरा पडत असल्याने काही जणांना जमिनीवर झोपावं लागत होतं. त्यामुळे एवढा मोठा बेड तयार केल्याचं साओनं इन्स्टाग्रामवर लिहिलं आहे.

6 / 6
आर्थरने केलेली लग्न कायद्यानुसार वैध नाहीत. कारण ब्राझीलमध्ये पॉलिगामी (एका पेक्षा महिलांसोबत लग्न करणं) रिलेशनशिपला कायदेशीर मान्यता नाही.