Budh Gochar 2025: मोक्कार पैसा मिळणार! अश्लेषा नक्षत्रात विराजमान बुध 3 राशींना करेल मालामाल

ग्रहांचा राजकुमार बुधने 22 ऑगस्ट 2025 रोजी राशी परिवर्तन केले आहे. कर्क राशीत असताना बुधदेवाने अश्लेषा नक्षत्रात गोचर केले आहे. या गोचरामुळे काही राशींना लाभ होण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया, शुक्रवारी झालेले हे गोचर कोणत्या तीन राशींसाठी वरदान ठरू शकते.

| Updated on: Aug 22, 2025 | 4:11 PM
1 / 6
बुध हा एक शुभ ग्रह मानला जातो. तो बुद्धी, तर्क, वाणी, संवाद आणि व्यापार यांचा दाता मानला जातो. ज्या व्यक्तींवर बुधदेवाची कृपा असते, त्यांना व्यापारात चांगला नफा मिळतो. तसेच, बुद्धी तीक्ष्ण होते आणि प्रत्येक कामात यश मिळते. शिवाय, वाणीत गोडवा आणि मृदुता ही बुधाच्या कृपेनेच येते. द्रिक पंचांगानुसार, 22 ऑगस्ट 2025 च्या पहाटे 4 वाजून 29 मिनिटांनी बुधदेवाने कर्क राशीत असताना अश्लेषा नक्षत्रात गोचर केले आहे. तिथे तो 30 ऑगस्ट 2025 पर्यंत राहील.

2 / 6
30 ऑगस्टला दुपारी 4 वाजून 48 मिनिटांनी बुधदेव अश्लेषा नक्षत्रासह कर्क राशीतून बाहेर पडेल आणि सिंह राशीत मघा नक्षत्रात प्रवेश करेल. चला जाणून घेऊया, बुधाच्या अश्लेषा नक्षत्र आणि कर्क राशीत असण्याच्या काळात कोणत्या तीन राशींना लाभ होण्याची शक्यता आहे.

3 / 6
बुधाची प्रिय रास असलेल्या मिथुन राशीच्या लोकांसाठी हे गोचर आनंद घेऊन आले आहे. तुम्हाला आधीपेक्षा जास्त आत्मविश्वास वाटेल. तसेच, नातेसंबंधांमध्ये भावनिक स्थिरता वाढेल. गेल्या काही काळापासून कोणतेही काम पूर्ण होत नसेल, तर ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. पोटाशी संबंधित समस्या फार त्रास देणार नाहीत. जोखमीच्या गुंतवणुकीतून व्यापाऱ्यांना फायदा होईल. 30 ऑगस्टपूर्वी मिथुन राशीच्या लोकांची नवीन नोकरीची शोध पूर्ण होऊ शकतो.

4 / 6
22 ऑगस्टला बुधच्या चाल बदलामुळे सर्वाधिक फायदा कन्या राशीच्या लोकांना होणार आहे. नोकरदारांना महत्त्वाच्या कामांमध्ये विलंब किंवा अडथळ्यांना सामोरे जावे लागणार नाही. विवाहित लोक वाद-विवाद टाळतील, तर नात्यात प्रेम वाढेल. तसेच, मुलांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. व्यापाऱ्यांना भागीदारीतील नवीन कामांमुळे फायदा होऊ शकतो. तरुण वर्ग समाजहितासाठी असे काही काम करू शकतात, ज्यामुळे त्यांची प्रतिष्ठा वाढेल आणि सामाजिक स्तरावर मान्यता मिळेल.

5 / 6
मिथुन आणि कन्या यांच्याव्यतिरिक्त वृश्चिक राशीच्या लोकांनाही बुध गोचरादरम्यान फायदा होण्याची शक्यता आहे. वयस्कर लोक तर्क-वितर्क टाळतील, तर घरात शांततेचे वातावरण राहील. नवीन भागीदारांशी वाद सुरू असेल, तर तो संपेल. व्यापारी निर्णय घेताना सावध राहिल्यास चांगले होईल. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी 30 ऑगस्टपर्यंतचा काळ उत्तम आहे. विद्यार्थ्यांच्या वर्तनात सकारात्मक बदल दिसेल आणि धार्मिक कार्यात मन रमेल.

6 / 6
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)