
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील तालुका कृषी कार्यालयाने कृषी संजीवनी सप्ताह आयोजन वाडी बुद्रुक परिसरात करण्यात आले होते.

कृषी विभाग थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांविषयी मार्गदर्शन करत असल्याने शेतकऱ्यांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिलाय.

परिसरातील शेतकऱ्यांना माती परीक्षण, सोयाबीन बीज प्रक्रिया, पिकावरील कीड व रोग नियंत्रण तसेच कपाशी पिकांचे उत्पादन वाढीची माहिती सांगितली.

कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी चांगलं मार्गदर्शन केल्यामुळे शेतकरीवर्ग अधिक खूश होता.

उपस्थित शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती सुद्धा यावेळी देण्यात आली.