घराच्या कोपऱ्यात पाल जाऊन बसलीये? बाहेर काढण्यासाठी घरात लावा ‘ही’ 5 रोपं
आजच्या लेखात आपण अशा पाच रोपांबद्दल जाणून घेणार आहोत जे तुमच्या घरात कोपऱ्यामध्ये लपलेली पाल बाहेर काढण्यास मदत करू शकतात.

घरात पाल दिसली की अनेकांना किळस वाटते, त्यामुळे घरातील पाली बाहेर काढण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. कारण घरात पालं आली की ते अनेकदा अन्नपदार्थांभोवती फिरतात, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. म्हणून पालींपासून मुक्त होण्यासाठी बाजारात अनेक केमिकल रिपेलेंट्स उपलब्ध आहेत, परंतु घरात असलेली लहान मुलं आणि पाळीव प्राण्यांमुळे बहुतेकजण नैसर्गिक उपायांना प्राधान्य देतात. तुम्हाला ही घरगुती उपाय करत असतील तर आपल्या निसर्गात असे काही वनस्पती आहेत ज्यांचा तीव्र वास पालींना आवडत नाही. ही रोपं पालींना नुकसान पोहोचवत नाहीत, उलट त्यांना घरातून बाहेर काढण्यास मदत करतात. तर ही झाडं तुम्ही दाराच्या कोपऱ्यात, खिडक्यांवर आणि बाल्कनीत ठेवल्याने केवळ सौंदर्य वाढतेच नाही तर कीटकांनाही दूर ठेवते. चला तर मग आजच्या लेखात आपण अशा पाच रोपांबद्दल सांगणार आहोत जे घरात आलेली पाल बाहेर काढण्यास मदत करतात.
1. रोझमेरी
घरात रोझमेरीचे रोप ठेवल्याने पाली घरा पासून दूर राहतात. कारण रोझमेरीच्या फुलांचा तीव्र वास पालींना आवडत नाही. तसेच हे रोझमेरीचं रोप कुंड्यांमध्ये वाढवायला ही अगदी सोपे असतात आणि तुम्ही ते तुमच्या बाल्कनीत, खिडकीजवळ किंवा दाराजवळ ठेवू शकता. ते कीटकांना देखील दूर ठेवते.
2. पुदिना
सरड्यांना पुदिनाचा तीव्र, तिखट वास आवडत नाही. जेव्हा त्याची पाने हिरवीगार असतात तेव्हा त्यांचा सुगंध सर्वात जास्त येतो. तुम्ही पुदिन्याचे रोप दरवाज्याजवळ, घराच्या कोपऱ्याजवळ किंवा इतर ठिकाणी जिथे पाल वारंवार दिसतात तिथे कुंडीत ठेवू शकता. तसेच पुदिन्याच्या पानांचा रस काढुन घराच्या कोपऱ्यात फवारणी करा.
3. निलगिरी
निलगिरीच्या वनस्पतींमध्ये नैसर्गिक तेले असतात, ज्यांचा तीव्र वास पालींसह अनेक किटकांना घरापासून दुर ठेवण्यास मदत करतात. तुम्ही ही रोपं घरात ज्या ठिकाणी सुर्यप्रकाश येतो त्या ठिकाणी कुंड्यांमध्ये लहान निलगिरीची रोपं लावू शकता. त्यांचा तीव्र वास कीटकांना दूर ठेवतो, ज्यामुळे पाल येण्याची शक्यता कमी होते.
4. पेन्सिल ट्री (कांडवेल )
पाली कांडवेलच्या रोपांपासून दूर राहतात कारण त्यांना त्याची पोत आणि रस आवडत नाही. हे रोपं उबदार भागात चांगली वाढतात आणि या रोपांला जास्त पाणी लागत नाही. त्याच्या रसाला थेट स्पर्श न करण्याची काळजी घ्या, कारण त्यामुळे ॲलर्जी होऊ शकते. म्हणून तुमच्या बागेत किंवा टेरेसमध्ये कांडवेल रोपं लावा.
5. लेमनग्रास
पालींना लेमनग्रासचा वास आवडत नाही कारण त्याला लिंबाचा वास असतो. ही वनस्पती लवकर वाढते आणि कुंड्यांमध्ये किंवा बागेत सहजपणे वाढवता येते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
