
एक प्रसिध्द टीव्ही अभिनेत्री ही सायबर क्राईमची शिकार झाली आहे. जेवण आॅनलाईन मागवणे या अभिनेत्रीला चांगलेच महागात पडल्याचे दिसत आहे.

कुंडली भाग्य मालिकेत महत्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री आकांक्षा जुनेजा हिच्या 30 हजार रूपयांवर डल्ला मारण्यात आलाय. आता याबद्दल मोठी माहिती अभिनेत्रीने दिली.

एक लिंक क्लिक करणे आकांक्षा जुनेजा हिला महागात पडल्याचे बघायला मिळत आहे. 5-5 मिनिटांच्या गॅपमध्ये तिच्या अकाऊंटमधून तब्बल तीस हजार रूपये गेले.

ज्यावेळी आकांक्षा जुनेजा हिच्या ही गोष्ट लक्षात आली. तेंव्हा तिने लगेचच बॅंकेत फोन करून आपले अकाऊंट बंद केले. आॅनलाईन जेवण मागवणे महागात पडल्याचे आकांक्षा जुनेजा हिने म्हटले.

आॅनलाईन जेवण मागवल्यानंतर आपल्याला एक काॅल आला आणि त्यांनी लिंक पाठवली होती. त्यावर प्रोटोकॉल चेंज झाल्याचे त्या व्यक्तीने सांगितल्याने मी ती लिंक क्लिक केली आणि माझे पैसे गेले, असे आकांक्षा जुनेजा म्हणाली.