
ट्रेनमधून मद्य नेण्याचे नियम सोपे आहेत. रेल्वेच्या नियमासोबतच प्रत्येक राज्याचे दारु बंदीचे कायदे यावर परिणाम करतात. प्रत्येक राज्याचे दारुबंदीचे नियम वेगवेगळे आहेत. त्या राज्यातून ट्रेन जाताना हे नियम लागू होतात.

रेल्वे कायदा 1989 चे कलम 165 रेल्वे अधिकाऱ्यांना संशयास्पद आणि गैर कायदेशीर सामानाची तपासणी करण्याचा आणि त्याला जप्त करण्याचा अधिकार आहे. याचा अर्थ भारतीय रेल्वेत मद्य घेऊन प्रवास करण्यास मनाई आहे. मग ती बाटली सिलबंद असली तरीही....

भारतात काही राज्यात दारुबंदी लागू आहे. गुजरात, बिहार, नागालँड आणि लक्षद्वीप या राज्यात मद्य खरेदी करणे, विकणे, वाहतूक करणे तिन्ही गोष्टींना बंदी आहे. यामुळे या राज्यातून ट्रेन जात असेल तर मद्यसोबत प्रवास करणे तुम्हाला अडचणीत आणू शकते.

जर तुम्ही अशा राज्यातून प्रवास करत आहात जेथे दारुबंदी नाही. तरीही काही गोष्टीची काळजी घेणे गरजेचे आहे. उदा. मद्याची बाटली सिल बंद असावी, मद्याचा वापर केवळ स्वत:साठी असावा. ती विक्रीसाठी नसावी.

ट्रेनमध्ये मद्य पिणे, दाखवणे वा नशेत गैरवर्तणूक करणे बेकायदेशीर आहे. रेल्वे कायदा कलम 145 आणि भारतीय न्याय संहितेनुसार तुम्हाला 1000 दंड आणि सहा महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो.

तुम्ही मद्य घेऊन दारुबंदीच्या राज्यातून ट्रेनने प्रवास करत असाल तर तेथील अबकारी कायदे तुम्हाला लागू होतील. त्यात अटक, दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.