Cancer : आहारातून हे पदार्थ आजच वगळा, कॅन्सरचा वाढवतात धोका..
रोजच्या दैनंदिन आहारातील काही पदार्थांपासून वेग-वेगळ्या प्रकारच्या कॅन्सरच्या धोका वाढवतात. या खाद्यपदार्थांनी गंभीर आजार होण्याचा धोका असतानाही लोक हे पदार्थ खाण्याचे सोडत नाहीत. कॅन्सर संशोधकांनी सांगितले की या पदार्थांना आपण आहारात हटवले पाहिजेत...

आपण नेहमी अजाणतेपणी अनेक पदार्थांना खात असतो, ज्याने कॅन्सरसारख्या आहारांचा धोका वाढत असतो.युनिव्हर्सिटी ऑफ केब्रिजच्या डिपोर्टमेंट ऑफ पॅथोलॉजीच्या पीएचडी स्टुडंट एना कॅनाडास एक कॅन्सर संशोधक आहे. एना यांनी कॅन्सर रिसर्चमध्ये सुमारे सहा वर्षांपर्यंत काम केले आहे. त्यांच्यामते काही पदार्थांना आहारातून वगळले पाहिजे. चला तर हे पदार्थ कोणते ते पाहूयात..

प्रोसेस्ड मीट- स्टोअर केलेले नॉनव्हेज, सॉसेज आणि बेकनला खाण्याचा ट्रेंड आता भारतातही वाढला आहे. एना कॅनाडास यांच्या मते डब्ल्युएचओ यांच्या मते अशा प्रकारचे प्रोसेस्ड मीट मानवात कॅन्सरची रिस्क वाढवते. खास करुन मोठ्या आतड्याचा कॅन्सरचा धोका वाढवते.त्यामुळे ते अत्यंत कमी प्रमाणात खावे.

अल्ट्रा-प्रोसेस्ड पॅकेज स्नॅक्स- चिप्स किंवा इतर स्नॅक्स एकदम कुरकुरीत आणि चविष्ठ असल्याने लोक याला खूप चवीने खातात. मात्र यात रिफाईंड कार्ब्स, कृत्रिम एडिटिव्स आणि प्रमाणाच्या बाहेर कॅलरी असते. ज्यामुळे शरीरात इंफ्लेमेशन वाढते, हा प्रॉब्लेम जास्त वेळ राहिला तर काही कॅन्सरचा धोका वाढू शकतो.

डीप फ्राय फास्ट फूड्स- भारतीयात डीप फ्राय केलेले पदार्थ नाश्त्यात खाण्यासाठी वापरले जाते. जास्त तापमानात ते शिजवल्याने एक्रिलामाईड नावाचे केमिकल्स त्यातून निघते. यामुळे फ्रेंच फ्राईज, बटाट्याचे चिप्स वा अन्य डीप फ्राय केलेल्या पदार्थांना आहारातून कमी करावे. कारण याने देखील चरबी वाढून कॅन्सरचा धोका वाढू शकतो.

सॉफ्ट ड्रिंक्स- सॉफ्ट ड्रिंक्स आपल्या मेटाबॉलिझमसाठी गंभीर धोका ठरु शकते. यातील साखर ब्लड ग्लुकोजची पातळी वाढवू शकते. यामुळे लठ्ठपणा देखील वाढतो. शरीरात जास्त चरबी जमा झाली तर अनेक प्रकारच्या कॅन्सरसाठी जोखीम वाढू शकते.

अल्कोहलची सवय- पार्टी आणि रोजच्या मित्रांच्या सोबतच्या संगतीने अनेक लोकांना अल्कोहॉल पिण्याची सवय लागते. अल्कोहॉलच्या मध्यम प्रमाणाच्या सेवना देखील अनेक प्रकारचे कॅन्सर उदा. स्तन, लिव्हर, कोलोरेक्टल ( मोठे आतडे ) आणि अन्य कॅन्सरची जोखीम वाढते.