MS Dhoni: क्वार्टर नंबर E-25, जिथे राहत होता कॅप्टन कूल, आता कसे आहे दोन खोल्यांचे ते घर?

Mahendra Singh Dhoni Quarter Number E-25: क्रिकेट स्टार, माजी कर्णधार कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनी याने आयपीएलमधून संन्यास घेतला. त्यानंतर त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टींची चर्चा होऊ लागली. त्यात रांचीमधील या घराला सुद्धा उजाळा मिळाला.

| Updated on: Nov 20, 2026 | 1:59 PM
1 / 6
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार, कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनी या आयपीएलमधून संन्यास घेतला. त्यानंतर धोनीसंबंधीच्या अनेक गोष्टींची चर्चा सुरू झाली. त्याचे रेकॉर्ड्स, त्याची पत्नी आणि तो राहत असलेल्या झारखंडमधील रांची येथील या घराचीही चर्चा सुरू झाली.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार, कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनी या आयपीएलमधून संन्यास घेतला. त्यानंतर धोनीसंबंधीच्या अनेक गोष्टींची चर्चा सुरू झाली. त्याचे रेकॉर्ड्स, त्याची पत्नी आणि तो राहत असलेल्या झारखंडमधील रांची येथील या घराचीही चर्चा सुरू झाली.

2 / 6

धोनीचे बालपण या घरात गेले. झारखंडमधील रांची येथील मेकॉन कॉलनीत हे घर आहे. या घराचा क्रमांक E-25 असा आहे. या घरात सध्या राजीव कुमार हे राहतात. कधीकाळी धोनीने इथे त्याचे बालपण घालवले आहे. सपना या घराच्या केअरटेकर आहेत. त्यांनी गेल्या 20 वर्षांत धोनीला इथं पाहिलेलं नाही.

3 / 6

घर क्रमांक E-25 हे एक सरकारी क्वॉर्टर आहे. धोनीचे काही फॅन या घराला पाहायला येतात. ते इथे सेल्फी काढतात. काही कंटेंट क्रिएटरही इथं येतात. त्यांच्या ब्लॉगमध्ये त्या या जागेची माहिती देतात. हे क्वॉर्टर धोनीच्या वडिलांना देण्यात आले होते.

4 / 6

धोनीचे कुटुंब या क्वॉर्टरमध्ये राहत होते. येथून धोनीची शाळा आणि क्रिकेटचा सराव करण्याचे मैदान जवळच आहे. विशेष म्हणजे धोनी जिथून मिठाई आणत होता. इतर साहित्य खरेदी करत होता. ते दुकानही इथून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. या मिठाईच्या दुकानाला धोनीचे मित्र अजूनही भेट देतात.

5 / 6

या घराचं सर्वात खास वैशिष्ट्ये म्हणजे घराच्या समोरच छोटंस पण तितकेच नीटनेटकं असलेला बगीचा. या गार्डनमध्ये विविध रंगांचे गुलाबाचे फुलं आणि इतर झाडं लागली आहे. या घरात एक डायनिंग हॉल, एक किचन आणि दोन बेडरूम आहे. हे घर छोटं असलं तरी सुंदर आहे. या घराच्या मागे एक मोठं गार्डन सुद्धा आहे.

6 / 6

घरापेक्षा मागील बगीचा मोठा आहे. याठिकाणी कर्मचाऱ्यांचे कुटुंब कपडे वाळू घालतात. इथे शिळोप्याच्या गप्पा मारल्या जातात. सरकारी क्वॉर्टरमधील महिला इथं एकत्र येतात. तर संध्याकाळी मुलं आणि कर्मचारीही फेरफटका मारतात. याच ठिकाणी धोनीने बालपण आणि किशोरवयीन काळ घालावला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us