Smit Machchhar : FlyDubai च्या स्मित मच्छारचा पगार किती? दुबईत पायलटला मिळतो तब्बल इतका पॅकेज
कॅप्टन स्मित मच्छार यांचा फ्लायदुबईमधील मासिक पगार, वेतनरचना, भत्ते आणि मिळणाऱ्या सुविधांची सविस्तर माहिती जाणून घ्या.

दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या फ्लायदुबईच्या FZ1073 विमानात उड्डाणादरम्यान को-पायलटने कॅप्टनवर हल्ला करून विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न केला. जखमी झाल्यानंतरही भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांनी विमान सुरक्षित उतरवले. ही घटना आता आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत आहे.
मूळ मुंबईचे असलेले स्मित मच्छार जून 2022 पासून फ्लायदुबईच्या बोईंग 737 ताफ्यात कॅप्टन म्हणून काम करतात. यापूर्वी त्यांनी स्पाइसजेटमध्ये 11 वर्षांहून अधिक काळ सेवा दिली असून त्यांचा एकूण उड्डाण अनुभव 9,750 तासांपेक्षा जास्त आहे.
इस्रायली अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, को-पायलटने कॉकपिटमध्ये हल्ला केला आणि विमानावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. यामुळे विमानाची उंची काही सेकंदांत सुमारे 14,300 फूट घसरली. जखमी असतानाही कॅप्टन मच्छार यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडला. त्यानंतर प्रवासी आणि क्रू सदस्यांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले. विमान सौदी अरेबियातील ताबूक येथे सुरक्षितपणे उतरवण्यात आले. तपास सुरू असून हल्ल्यामागील नेमका हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही.
या घटनेनंतर फ्लायदुबईतील पायलट पगाराचीही चर्चा सुरू झाली आहे. कंपनीच्या अधिकृत वेतनरचनेनुसार कॅप्टनला मूळ वेतन, हाउसिंग आणि ट्रान्सपोर्ट अलाउन्स मिळून दरमहा 50,235 दरमहा तर सरासरी ७० फ्लाइंग तासांसाठी 16,310 दरमहा व्हेरिएबल पे मिळतो.
एकूण सरासरी मासिक पॅकेज 66,545 दरमहा (सुमारे 17.39 लाख रुपये) होते. वर्षभरात हे सुमारे 2.09 कोटी रुपये होते. मात्र हा आकडा कंपनीच्या जाहीर रचनेवर आधारित आहे; स्मित मच्छार यांचा वैयक्तिक पगार यापेक्षा वेगळा असू शकतो.
फर्स्ट ऑफिसरचे सरासरी मासिक पॅकेज 48,410 दरमहा (सुमारे 12.64 लाख रुपये) आहे. याशिवाय मेडिकल इन्शुरन्स, शैक्षणिक मदत, 42 दिवस सशुल्क रजा, सवलतीचे तिकिटे आणि इनकम प्रोटेक्शन यांसारख्या अतिरिक्त सुविधाही दिल्या जातात.