
तेजस्वी प्रकाश - ‘बिग बॉस’च्या 15 पर्वाची विजेती,टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने ‘सेलिब्रिटी मास्टर शेफ’साठी सर्वाधिक मानधन घेतलं आहे. रिपोर्टनुसार तिला प्रत्येक आठवड्यासाठी 3 ते 4 लाख रुपये मिळतात.

गौरव खन्ना - अनुपमा फेम गौरव खन्नाही या शोमध्ये सेलिब्रिटी शेफ बनून आला आहे. या शोमध्ये सहभागी येण्यााठी त्याल दर आठवड्याला 2.5 लाख रुपये मिळतात.

निक्की तांबोळी - बिग बॉस 14, बिग बॉस मराठी 5 , खतरोंके खिलाडी अशा अनेक रिॲलिटी शोमध्ये सहभागी झालेली निक्की तांबोळीही सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये तिचे कुकिंग स्किल्स दाखवणार आहे. त्यासाठी ती दर आठवड्याला 1.5 लाख रुपये आकारते.

दीपिका कक्कर - ‘ससुराल सिमर का’ फेम दीपिका कक्कर ही मोठ्या ब्रेकनंतर छोट्या पडद्यावर पुन्हा परतली आहे. तिला प्रत्येक आठवड्यासाठी2 ते 3 लाख रुपयांचं मानधन दिलं जात आहे.

उषा नाडकर्णी - लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णीदेखील या कार्यक्रमात पाहायला मिळत आहेत. त्यांना या कार्यक्रमासाठी प्रत्येक आठवड्याला 1 लाख रुपयांचं मानधन दिलं जात आहे.

अर्चना गौतम - ‘बिग बॉस’च्या १६ पर्वात झळकलेली अर्चना गौतमही या शोमध्ये सहभागी झाली असून तिला प्रत्यक आठवड्यासाठी 1.5 लाख दिले जातात.

राजीव अदातिया - बिग बॉस च्या 15 व्या सीझनमध्ये झळकलेला राजीव अदातिया हाँ देखील या शोमधील एक स्पर्धक आहे. त्याला दर आठवड्याला 1 लाख रुपये मिळतात.