Mahapalika Elections Voting 2026 : राज ठाकरे, आमिर खान ते मोहन आगाशे… महापालिका निवडणुकीत कोणी-कोणी केलं मतदान ?

महाराष्ट्रातील 29 महापालिकांसाठी मतदान होत असून राज्यभरात मतदारांनी मोठ्या उत्साहात मतदान केलं. अनेक राजकारणी, सेलिब्रिटी यांनीही मतदानाचं कर्तव्य पार पाडलं.

manasi mande | Updated on: Jan 15, 2026 | 1:59 PM
1 / 10
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही बीएमसी निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचे कर्तव्य बजावले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी, मुलगी, मुलगा अमित ठाकरे आणि सून हेही मतदानासाठी आले होते.

2 / 10
अभिनेता आमिर खान यानेही मुंबईत मतदानाचे कर्तव्य पूर्ण केलं. सर्वांनी घराबाहेर पडून मतदानाचा हक्क अवश्य बजावा, असं आवाहन त्याने महाराष्ट्रातील नागरिकांना केलं.

3 / 10
ज्येष्ठ लेखक, कवी, गीतकार गुलजार यांनीही मुंबईत आज मतदानाचे कर्तव्य पूर्ण केलं. आपली मुळं देशात घट्ट रुजलेली आहे. मतदान करून या मुळांची आणि लोकशाहीची काळजी घेणं गरजेचं आहे. त्ायमुळे आपल्या देशाप्रती असलेलं मतदानाचं कर्तव्य अव्शय निभवा, असं गुलजार म्हणाले.

4 / 10
जेष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनी पुण्यातील प्रभात रोडवरच्या विमलाबाई गरवारे शाळेतील मतदान केंद्रावर येत  मतदानाचा हक्क बजावला.  - यावेळी मतदान केल्यानंतर भावना शून्य झालेलो आहे अशी खोचक प्रतिक्रिया मोहन आगाशे यांनी दिली. सुरुवातीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यात मोठा फरक पडलेला आहे. नक्की कोण कुठे आहे हेच कळत नाही. एकदिलाने काम करायचं म्हणतात.. कृतीत होणार आहे की नाही?.. हे माहिती नाही. एकूणच फार अवघड होत चाललेल आहे असंही ते म्हणाले.

5 / 10
अभिनेता आमिर खान याचा मुलगा अभिनेता जुनैद खान, रीना दत्ता आणि आयरा खान यांनीही आज मुंबईत मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचे कर्तव्य पूर्ण केलं.

6 / 10
ज्येष्ठ गायक कैलाश खेर यांनीही मुंबईत मतदान केंद्रावर हजेरी लावत मतदानाचा हक्क बजावला. मुंबईतील लोकं खूप जबाबदार आहेत आणि ते त्यांचं कर्तव्य नक्की पार पाडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

7 / 10
अभिनेता प्रवीण तरडे यांनीही पुण्यात मतदानाचा हक्क बजावला. पत्नीसह मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी मतदान केलं.

8 / 10
बॉलिवूडमधील अभिनेत्री आणि लेखिका ट्विंकल खन्ना हिनेही महाराष्ट्र महापालिकांसाठी मुंबईत आज मतदानाचा अधिकार बजावला.

9 / 10
मतदान करणं हा आपला अधिकार आहे. आपण घरातून बाहेर पडून मतदान करून आपला हक्क बजावला पाहिजे, असं म्हणत अभिनेत्री दिव्या दत्ता हिने सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केलं.

10 / 10