घरातलं बेसीन म्हणजे या विषारी प्राण्याचं घर, चुकूनही चावल्यास माणसाचं काही खरं नाही!
अनेक आजार हे टॉयलेट, बाथरुम आणि बेसीन स्वच्छ नसल्यानेच होतात. त्यामुळेच या तिन्ही जागांची वेळोवेळी स्वच्छता होणे खूप गरजेचे असते. परंतु अनेकवेळा स्वच्छता करूनही या जागा पुन्हा-पुन्हा घाण होतच राहतात.

घरात सर्वाधिक महत्त्वाचे ठिकाण असते ते म्हणजे टॉयलेट, बाथरुम आणि बेसीन. या तिन जागा स्वच्छ, नीटनेटक्या असणे गरजेचे असते. कारण या जागा जर स्वच्छ नसतील तर तुम्हाला आजार होण्याची शक्यता असते.

अनेक आजार हे टॉयलेट, बाथरुम आणि बेसीन स्वच्छ नसल्यानेच होतात. त्यामुळेच या तिन्ही जागांची वेळोवेळी स्वच्छता होणे खूप गरजेचे असते. परंतु अनेकवेळा स्वच्छता करूनही या जागा पुन्हा-पुन्हा घाण होतच राहतात.

बेसीन ही तर अशी जागा आहे, जिथे अनेक कीटक आढलतात. नळाजवळ, बेसीनच्या कोपऱ्यात झुरळासारखे कीटक दबा धरून बसलेले असतात. परंतु याच बेसीनजवळ आणखी एक मोठा सरपटणारा कीडा असतो. त्याने चावा घेतला तर तुम्हाला प्रसंगी रुग्णालयातही जावे लागू शकते.

या कीड्याचे नाव आहे गोम. ज्या ठिकाणी आर्द्रता असते, वातावरण दमट असते किंवा ओलावा असतो तेथे गोम आपलं घर तयार करतात. बेसीनमध्ये नेहमीच ओलावा असतो. त्यामुळे त्या बेसीनमध्ये एखादी खाच असेल तर त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या असू शकतात.

त्यामुळे बेसीनमध्ये गोम लपून बसू नये यासाठी बेसीनची नियमित स्वच्छता होणे गरजेचे आहे. सोबतच बेसीनला कुठे भेगा असतील, कुुठे खाचा असतील तर त्या लगेच बुजून घ्याव्यात. त्या दुरुस्त करून घ्याव्यात म्हणजे अशा ठिकाणी गोम घर करून बसत नाही.