
Chanakya Niti : आचार्य चाणक्य हे भारतातील आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या विद्वानांपैकी एक आहेत. अर्थशास्त्र, राजकारण या विषयात त्यांचा हातखंडा होता. त्यांनी पुरुषांना काही विशेष सल्ले दिले आहेत. पुरुषांनी आयुष्यात काही गोष्टी कधीच कुणाला सांगू नये, असं चाणक्य यांनी म्हटलंय.

पुरुषांनी काही गोष्टी कधीच आपले मित्र, नातेवाईक किंवा इतर कोणालाही सांगू नये. या गोष्टी सांगितल्या तर तुमचे हसू होऊ शकते, असे चाणक्य यांचे मत आहे.

आचार्य चाणक्य यांच्या सांगण्यावरून पुरुषांनी कधीच आपल्या भविष्यातील योजना कोणालाही बोलून दाखवू नयेत. कारण या योजना जर भविष्यात सत्यात उतरल्या नाहीत तर तुमचे हसू होऊ शकते.

तुमची कोणी थट्टा-मस्करी केली असेल, तुमचा अपमान झाला असेल तर हे कधीही कोणालाही सांगू नका. कारण माझा अपमान झाला हे, लोकांना सांगितले तर किंमत कमी होते.

पुरुषांनी आपल्या कुटुंबातील अडचणी, भांडणं कधीच कुणाला सांगू नयेत. तसेच आपल्या पत्नीचे चारीत्र्य, व्यावहार याबाबतही कधीच कोणाला सांगू नये. यामुळे तुमची चर्चेचं, मस्करीचं निमित्त ठरू शकता.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.