
आचार्य यांनी त्यांच्या चाणक्य नीती या पुस्तकात आयुष्याशी निगडीत गोष्टी लिहल्या आहेत. जर तुम्हाला सतत कोणी फसवत असेल किंवा माणसांची ओळख करण्यात तुम्ही चुकत असाल तर खालील गोष्टींचा अवलंब करा तुम्हाला कोणीच फसवू शकणार नाही.

आचार्य चाणक्यांच्या मते अनेकदा आपण एखाद्याबद्दल खूप लवकर मत बनवतो, तर त्याचे गुण-दोष समजण्यासाठी थोडा वेळ लागतो. त्यामुळे त्याच्या वागणुकीचे निरीक्षण करा. तो व्यक्ती इतर लोकांशी कसा वागतो ते पहा. इतरांशी वागताना त्याचा खरा स्वभाव तुमच्यासमोर येईल.

त्यागाची भावना माणसामध्ये किती आहे हे पाहणेही खूप महत्त्वाचे आहे. ज्या लोकांमध्ये ही भावना असेल, तेच इतरांचे दु:ख समजून घेणारे आणि मदत करणारे आहेत. ज्यांना त्याग कसा करावा हे माहित नाही ते स्वार्थी आहेत आणि त्यांचा अर्थ प्राप्त करण्यासाठी काहीही करू शकतात.

ती व्यक्ती ज्या कामाशी निगडीत आहे त्यावरूनही त्या व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज लावता येतो. जर एखाद्याने व्याज घेतले तर धूर्तपणा त्याच्या स्वभावात निश्चित आहे. तुम्ही त्याच्या कडून दयाळूपणा आणि प्रामाणिकपणाची अपेक्षा करु नका.

एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक वैशिष्ट्ये पाहिली पाहिजेत, त्याची मूल्ये माणसाबद्द्ल बरच काही सांगून जातात. जो माणूस सुसंस्कृत असतो, त्याच्या आयुष्यात काही तत्त्वे नक्कीच असतात. तो कोणावरही अन्याय करणार नाही.