AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना परीक्षा, ना मुलाखत… HPCL मध्ये तरुणांसाठी मेगाभरती, अर्ज कसा कराल? पगार किती? जाणून घ्या A टू Z माहिती

HPCL मध्ये ६०८ पदवीधर शिकाऊ उमेदवारांसाठी भरती जाहीर झाली आहे. बीई आणि बीटेक पदवीधरांना २५,००० रुपये स्टायपेंडसह प्रशिक्षणाची संधी मिळत आहे. कोणतीही परीक्षा नाही, निवडीची प्रक्रिया केवळ गुणवत्तेवर आधारित असेल. आजच अर्ज करा!

ना परीक्षा, ना मुलाखत...  HPCL मध्ये तरुणांसाठी मेगाभरती, अर्ज कसा कराल? पगार किती? जाणून घ्या A टू Z माहिती
HPCL Recruitment
| Updated on: Feb 22, 2026 | 1:26 PM
Share

इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करून सरकारी क्षेत्रात करिअरची पहिली पायरी चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातील आघाडीची तेल आणि वायू कंपनी असलेल्या हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) ने ६०८ पदवीधर शिकाऊ उमेदवारांच्या (Graduate Apprentice) भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल यांसारख्या विविध शाखांमधील पदवीधरांना देशातील एका प्रतिष्ठित कंपनीत कामाचा अनुभव घेता येणार आहे.

रिक्त पदांचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता

HPCL ने एकूण ६०८ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.E. किंवा B.Tech पदवी असणे आवश्यक आहे. या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार प्रामुख्याने सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, आणि इन्स्ट्रुमेंटेशन या शाखांमधील असावा. यात जनरल आणि OBC उमेदवारांना किमान ६० टक्के, तर SC/ST/PWD उमेदवारांना किमान ५० टक्के गुण असणे अनिवार्य आहे. केवळ १ एप्रिल २०२३ किंवा त्यानंतर उत्तीर्ण झालेले उमेदवारच या भरतीसाठी पात्र ठरतील.

वयोमर्यादा आणि सवलत

अर्जदाराचे वय किमान १८ ते २५ वर्षे दरम्यान असावे. सरकारी नियमांनुसार, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

  • SC/ST: ५ वर्षे सवलत.
  • OBC (NCL): ३ वर्षे सवलत.
  • PWD: १० वर्षे सवलत.

कोणतीही परीक्षा नाही

या भरतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड पूर्णपणे त्यांच्या इंजिनिअरिंगमधील गुणांच्या टक्केवारीवर आधारित असेल. गुणवत्तेनुसार निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल. निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना दरमहा एकूण २५,००० रुपये स्टायपेंड दिला जाईल. यामध्ये HPCL कडून २०,५०० रुपये आणि भारत सरकारच्या DBT योजनेद्वारे ४,५०० रुपये दिले जातील.

अर्ज कसा करावा?

१. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ‘Apprentice 2026’ लिंकवर क्लिक करा. २. ‘New Registration’ करून आपला लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवा. ३. लॉगिन केल्यानंतर आपली वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती अचूक भरा. ४. आपली अभियांत्रिकी शाखा आणि संबंधित राज्य निवडा. ५. आवश्यक कागदपत्रे अपलोड करून फॉर्म सबमिट करा आणि अर्जाची प्रिंट काढून ठेवा.

Follow Us
राजकीय हालचाली वाढल्या! केंद्रातील मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत...
BJP Meeting | राजकीय हालचाली वाढल्या! केंद्रातील मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत... काय घडतंय?
देवेंद्र फडणवीसांचा नवा विक्रम! शरद पवारांनाही टाकले मागे
Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा नवा विक्रम! मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात शरद पवारांनाही टाकले मागे
देवेंद्र फडणवीस मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष, मग ठाकरे गटाच्या आंदोलनाला
देवेंद्र फडणवीस मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष, मग ठाकरे गटाच्या आंदोलनाला हिरवा कंदील मिळणर?
लाडक्या बहिणींना मोठा धक्का! 92 लाख महिलांचा हप्ता बंद; सरकारची मोठी..
Ladki Bahin | लाडक्या बहिणींना मोठा धक्का! 92 लाख महिलांचा हप्ता बंद; सरकारची मोठी छाननी
जेजुरीत भरधाव टेम्पोने वारकऱ्यांनाच चिरडलं, आकडा आला समोर
Jejuri Vari Accident | भंडाऱ्याच्या उत्साहात काळाचा घाला! जेजुरीत भरधाव टेम्पोने वारकऱ्यांनाच चिरडलं, आकडा आला समोर
मुंबईत संतापजनक घटना! चिमुकलीवर वॉचमनकडून अत्याचार, नराधम अटकेत
मुंबईत संतापजनक घटना! चिमुकलीवर वॉचमनकडून अत्याचार, नराधम अटकेत
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणी
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणीने राजकीय वर्तुळात खळबळ!
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवर
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवरच उगारला चाकू, पुढे...
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं फडणवीसांबाबत मोठं विधान, थेट...
पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना
Beed | पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना; शेतकरी हवालदिल