AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावध व्हा… बायको जेम्स बाँड बनतेय, GPS लावून नवऱ्याचा पाठलाग; हॉटेलात पोचल्यावर नको ते दिसलं, त्यानंतर तांडव

उत्तर प्रदेशच्या हापूडमध्ये एका पत्नीने पतीच्या विवाहबाह्य संबंधांचा पर्दाफाश केला आहे. पतीच्या गाडीत GPS ट्रॅकर बसवून बायकोने त्याला हॉटेलमध्ये दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडले. या घटनेनंतर हॉटेलपासून कोर्टापर्यंत मोठा गदारोळ झाला. पोलीस कारवाईनंतरही वाद शांत झाला नाही. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली असून नात्यातील विश्वासाच्या तडा गेलेल्या परिस्थितीवर प्रकाश टाकते.

सावध व्हा... बायको जेम्स बाँड बनतेय, GPS लावून नवऱ्याचा पाठलाग; हॉटेलात पोचल्यावर नको ते दिसलं, त्यानंतर तांडव
पती दुसऱ्या महिलेसोबत दिसला, बायकोने धू धू धुतला
| Updated on: Jul 13, 2026 | 11:37 AM
Share

नवरा-बायकोचं नातं हे विश्वासावर आधारित असतं. पण त्याचा विश्वासाला तडा गेला तर तो कधीच सांधता येत नाही. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशच्या हापूडमध्ये घडला. उत्तर प्रदेशातील हापूडमध्ये एका पत्नीने पतीच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी असा डाव आखला की, त्यातून थेट हायव्होल्टेज ड्रामा घडला. पतीच्या गाडीत बसवलेल्या GPS ट्रॅकरने त्याला थेट एका हॉटेलपर्यंत पोहोचवलं आणि पुढे जे घडलं, त्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. बागपत येथील एका महिलेचा दावा आहे की, तिला पतीच्या वागण्यात बदल जाणवत होता. पतीच्या चारित्र्यावर संशय वाढल्यानंतर तिने आपल्या दिराच्या मदतीने त्याच्या कारमध्ये GPS ट्रॅकर बसवला. त्यानंतर ती पतीच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवू लागली.

रविवारी तिचा पती नेहमीप्रमाणे घरातून बाहेर पडला… पण यावेळी पत्नीही सज्ज होती. GPSच्या सिग्नलचा पाठलाग करत ती आपल्या कुटुंबीयांसह थेट हापूडच्या मोदीनगर रोडवरील बांके बिहारी हॉटेलमध्ये पोहोचली. आणि तिथे दिसलं ते पाहून पत्नीच्या पायाखालची जमीनच सरकली. हॉटेलमध्ये आपला पती एका दुसऱ्याच महिलेसोबत असल्याचं तिला आढळलं. क्षणात तिथलं वातावरण बदललं… प्रश्नांचा भडिमार सुरू झाला… आणि काही वेळातच वादाचं रूपांतर मोठ्या गोंधळात झालं.

हॉटेलमध्ये हंगामा, रस्त्यावर तमाशा!

पतीला कथित प्रेयसीसोबत पाहिल्यानंतर पत्नी आणि तिच्या नातेवाईकांचा संताप अनावर झाला. हॉटेलच्या आवारात जोरदार वाद झाला आणि पतीला मारहाण करण्यात आली असा आरोप आहे. मात्र, हा ड्रामा इथेच थांबला नाही. हॉटेलपासून सुरू झालेला वाद रस्त्यावर आला. गर्दी जमा झाली, लोकांनी मोबाईल कॅमेरे बाहेर काढले आणि संपूर्ण घटना सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही पक्षांना ताब्यात घेत सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात नेलं. शांतताभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरू केली.

पतीला केली मारहाण

पोलिसांच्या कारवाईनंतर पतीला SDM न्यायालयातून जामीन मिळाला. मात्र, न्यायालयाच्या आवारातच पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला. पत्नीने तिथेच पतीला जाब विचारला आणि तिथेच त्याला धु धु धुतला, असंही समोर आलं.

त्यानंतर त्या महिलेने पोलिसांकडे तक्रार केली. त्यात असा दावा केला की, पतीसोबत आढळलेली महिला बुलंदशहर जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात नर्स म्हणून काम करते, स्थानिकांनीही तीच कहाणी सांगितली. मात्र या दाव्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान, हापूड पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून, दोन्ही बाजूंच्या तक्रारी आणि आरोपांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Follow Us
सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट...
Rohit Pawar : सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट म्हणाले...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही राबवणार विशेष मोहीम
रोहित पवारांच्या वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, राजकारण
रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, 'राजकारणात इतका उतावळेपणा कशासाठी?'
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे...
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे आदेश, देवगिरी बंगल्यावर मोठ्या घडामोडी!
ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध...
Thane : ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही..
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही मिळणार पितृत्व रजा
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली...
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली, भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट, पोलीस यंत्रणा सतर्क!
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर बुलडोझर
दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला
Rohit Pawar : अजित दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला