
आज महिला दिन आहे. महिला दिनी अनेक यशस्वी स्त्रीयांची यशोगाथा आपण वाचतो. महिलांनी आज अनेक क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे. पुरूषांच्या एक पाऊल पुढे जात त्यांनी कर्तृत्व सिद्ध केले आहे. आचार्य चाणक्य यांनी सुद्धा महिलांच्या बुद्धीचे कौतुक केले आहे.

नीतीशास्त्र या ग्रंथात चाणक्यांनी स्त्रीणां द्विगुण आहारो बुद्धिस्तासां चतुर्गुणा। साहसं षड्गुणं चैव कामोऽष्टगुण उच्यते ।। असं म्हटलं आहे. या श्लोकात त्यांनी स्त्रीयांच्या कर्तृत्वाचा पाढा वाचला आहे.

या श्लोकानुसार, स्त्रीयांचा पुरुषांपेक्षा आहार दुप्पट आहे. तर त्यांची बुद्धिमत्ता पुरुषांपेक्षा चौपट आहे. पुरुषांपेक्षा त्या सहा पट धैर्यवान आहेत. त्यांची लैंगिक इच्छा पुरूषांपेक्षा आठ पट अधिक आहे.

चाणक्य यांच्या मते, स्त्रीयांना सर्वाधिक काम करावे लागते. घरातील लहानसहान आणि नियोजनाचे मोठे काम त्यांच्याकडे असते. पुरुषांपेक्षा शारीरिक श्रम अधिक आहेत. त्यामुळे त्यांचा आहार हा पुरुषांपेक्षा अधिक आहे.

चाणक्यांच्या मते, महिलांमध्ये पुरुषांपेक्षा चौपट बुद्धिमत्ता आहे. त्या पुरुषांपेक्षा अधिक बुद्धीचा कस लावतात. घरात काय हवे आणि काय नको याची जाणीव त्यांना असते. नातेसंबंध टिकवण्यापासून नातेवाईकांची ओळख ठेवण्यापर्यंत त्यांची भूमिका महत्त्वाची असते.

ही सर्वसामान्य माहिती, टीव्ही 9 त्याला दुजोरा देत नाही