
राग हा माणसाचा शत्रू आहे. रागावलेला माणूस कधीही योग्य निर्णय घेऊ शकत नाही. रागाच्या भरात तो चुकीचे निर्णय घेतो आणि आपल्या हट्टाला चिकटून राहतो. अशी व्यक्ती सर्वकाही असूनही हरते. अशा लोकांवर माता लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही. त्यामुळे कधीच रागावू नका.

जर तुम्हाला देवी लक्ष्मीच्या कृपेने पैसा मिळेल असेल तर तुम्ही त्याचा सदुपयोग करा. पण जे लोक गर्वाने इतरांचा अपमान करतात, त्यांच्यावर माता लक्ष्मी कधीही प्रसन्न होत नाही. अशा लोकांचा पैसा उद्ध्वस्त होण्यासाठी वेळ लागत नाही.

लोभी व्यक्तीलाही देवी लक्ष्मीच्या नाराजीला सामोरे जावे लागते. योग्य मार्गाचा अवलंब केल्याने आणि कष्टाने पैसा कमावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. पण जे लोभी होऊन चुकीचा मार्ग निवडतात, इतरांच्या संपत्तीवर डोळा ठेवतात, हळूहळू त्यांचे सर्व काही नष्ट होते.

लक्ष्मी देवीची कृपा मिळवायची असेल तर आळस सोडून कठोर परिश्रम करावे लागतील. आळशी माणूस आपला वेळ वाया घालवतो आणि स्वतःचे भांडवलही वाया घालवतो. अशा लोकांवर देवी लक्ष्मी कधीही प्रसन्न होत नाही. त्यामुळे कष्टाने पैसे मिळवून आयुष्य जगा.

तुमच्याकडे पैसा असेल तर त्याचा दुरुपयोग करू नका. परोपकार आणि इतरांना मदत करणे यासारख्या चांगल्या कामात त्याचा वापर करा. उधळपट्टीने पैसे खर्च करणाऱ्यांवर देवी लक्ष्मी प्रसन्न होत नाही. तुमच्याकडे असणाऱ्या पैसाचा वापर दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी करा त्यामुळे तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल.