Maharashtra Forts : हरिहर आणि राजगडपेक्षाही सर करायला कठीण आहे हा किल्ला, भल्या भल्या ट्रेकर्सनाही फुटतो घाम

हरिहर गडाच्या उभ्या कातळाची चढाई अनेकांना आव्हानात्मक वाटते, पण या किल्ल्याचा अंतिम टप्पा त्याहूनही कठीण मानला जातो. अरुंद खडकाळ वाट, तीव्र चढाई आणि खोल दऱ्यांमुळे अनुभवी ट्रेकर्सचीही कसोटी लागते.

| Updated on: Oct 07, 2026 | 8:46 PM
1 / 8
हरिहर गडाचा उभा कातळ सडा चढताना अनेकांची धडधड वाढते. पण सह्याद्रीत असा एक किल्ला आहे, जो सर करायला हरिहरपेक्षाही भयानक कठीण आहे. खडकाळ वाट, तीव्र चढाई, आजूबाजूला असणाऱ्या खोल दऱ्या यामुळे सराईत ट्रेकर्सनाही इथे अक्षरक्ष:घाम फुटतो. मग नेमका कुठे आहे हा किल्ला जाणून घ्या

हरिहर गडाचा उभा कातळ सडा चढताना अनेकांची धडधड वाढते. पण सह्याद्रीत असा एक किल्ला आहे, जो सर करायला हरिहरपेक्षाही भयानक कठीण आहे. खडकाळ वाट, तीव्र चढाई, आजूबाजूला असणाऱ्या खोल दऱ्या यामुळे सराईत ट्रेकर्सनाही इथे अक्षरक्ष:घाम फुटतो. मग नेमका कुठे आहे हा किल्ला जाणून घ्या

2 / 8

चंदेरी किल्ला : चंदेरी किल्ला रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरातील सह्याद्रीच्या रांगेत आहे. बदलापूर किंवा वांगणीहून चिचवली या गावाक़डून चांदेरीकडे जाणारा मार्ग आहे.तर दुसरा मार्ग पनवेलच्या तामसईकडून आहे.

3 / 8

चंदेरीचा ट्रेक :चंदेरीच्या ट्रेकमध्ये दोन महत्त्वाचे टप्पे येतात. पहिला टप्पा हा चिचवली गावापासून चांदेरीच्या गुहेपर्यंत आहे. जो बऱ्यापैकी सोपा आहे. मात्र गुहेनंतर शिखरापर्यंतचा भाग घाम फोडणारा आहे.

4 / 8

ट्रेकर्सची खरी परीक्षा गुहेनंतर सुरू होते :चांदेरीच्या गुहेपर्यंत पोहोचल्यानंतर अनेक ट्रेकर्स मागे फिरतात.कारण पुढचा मार्ग प्रचंड अरूंद, उघडा आणि खडकाळ आहे. फारच अरुंद जागा,उभी चढाई आणि बाजूला असणारी खोल दरी यामुळे हा ट्रेक कठीण मानला जातो.

5 / 8

उभी चढाई : शिखराच्या दिशेने जाणाऱ्या अंतिम भागात खडकावर मोठ्या उताराने चढाई करावी लागते. काही ट्रेकिंग नोंदीप्रमाणे ही चढण जवळपास 80 अंशापर्यंत आहे.

6 / 8

सैल दगडांमुळे धोका असतो :चंदेरीच्या अंतिम चढाईत काही ठिकाणी खडक आणि दगड सैल असल्याचे ट्रेकिंग नोंदीमध्य नमुद आहे. त्यामुळे पावसाळ्यात हा गड चढताना विशेष काळजी घ्यावी लागत.

7 / 8

वर पोहोचल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा दिसतो :चंदेरीच्या सर्वोच्चा शिखरावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. या ठिकाणी पोहोचण्यासाठी प्रचंड कठीण खडकाळ भाग सर करावा लागतो. या शिखरावरून आजूबाजूच्या सह्याद्रीच्या डोंगररांगांचे विहंगम दृश्य दिसते.

8 / 8

चंदेरी प्रत्येक ट्रेकर्ससाठी नाही आहे :चंदेरीचा बेस ते गुहा ट्रेक आणि गुहेपासून सुळक्यापर्यंतची चढाई यांच्यात मोठा फरक आहे. ही चढाई फार आव्हानात्मक आणि कठीण आहे. अंतिम भाग सर करण्यासाठी शारीरिक क्षमता, खडक चढण्याचा अनुभव, योग्य सुरक्षा उपकरणे आणि अनुभवी मार्गदर्शकाची गरज महत्त्वाची असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us