PHOTOS देशभरात कसे दिसले यावर्षाचे शेवटचे चंद्र ग्रहण, एक तास 19 मिनिटे राहिले ग्रहण

chandra grahan 2023 | कोजागिरी पोर्णिमेच्या रात्री भारतासह संपूर्ण आशिया, युरोप, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया खंडात खंडग्रास चंद्र ग्रहण दिसले. हे चंद्रग्रहण यावर्षाचे शेवटचे ग्रहण होते. भारतात रात्री 1:05 वाजता चंद्र ग्रहणास सुरुवात झाली. ते रात्री 2:24 होते. एक तास 19 मिनिटे चंद्रग्रहण राहिले.

| Updated on: Oct 29, 2023 | 8:04 AM
1 / 5
देशभरात शनिवारी मध्यरात्री चंद्रग्रहण दिसून आले. सर्वात आधी मुंबईतील चेंबूरमध्ये चंद्र ग्रहण दिसून आले. गुजरातमधील राजकोटमध्ये चंद्र ग्रहणाचा शेवट झाला. चंद्र ग्रहण ही सर्वात महत्वाची खगोलीय घटना आहे. यावर्षाचा हा शेवटचा चंद्र ग्रहण होता.

2 / 5
महाराष्ट्रात चंद्र ग्रहण पाहण्याचा आनंद खगोल प्रेमींनी घेतला. चंद्र ग्रहण खंडग्रास अवस्थेत दिसले. या वेळी चंद्राच्या सुमारे पाच टक्के भागावर पृथ्वीची गडद सावली पडल्याचे दृश्य दिसेल. रात्री एक वाजून 05  मिनिटांनी चंद्राने पृथ्वीच्या गडद छायेला स्पर्श केला.

3 / 5
चंद्राच्या सुमारे पाच टक्के भागावर पृथ्वीची गडद छाया पडल्याचे दृश्य दिसेल. दोन वाजून 24 मिनिटांनी चंद्र पृथ्वीच्या गडद सावलीतून बाहेर पडल्यावर खंडग्रास अवस्था संपली. पहाटे तीन वाजून ५४ मिनिटांनी चंद्र पृथ्वीच्या उपछायेतून बाहेर पडला.

4 / 5
देशभरात दिसलेले हे यावर्षाचे शेवटचे चंद्र ग्रहण होते. आता 25 मार्च 2024 रोजी पुढील चंद्र ग्रहण दिसणार आहे. कोजागिरी पोर्णिमेस चंद्र ग्रहण अनेक वर्षांनी दिसले. यापूर्वी  2005 मध्ये कोजागिरी पोर्णिमेस चंद्र ग्रहण दिसले होते.

5 / 5
चंद्र ग्रहण भारतासह पृथ्वीवरील जवळपास सर्वत्र दिसले. युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, उत्तर/पूर्व दक्षिण अमेरिका, पॅसिफिक, अटलांटिक, हिंद महासागर आणि अंटार्क्टिका येथे चंद्र ग्रहण पाहिले गेले.