Uddhav Thackeray : चंद्रकांत पाटील हे काय बोलून गेले? थेट उद्धव ठाकरेंची पाठराखण? त्या एका विधानाने खळबळ!
देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीसाठी पहाटे चार वाजता पत्रकार परिषद घ्यायला लावली होती. अनेक मुख्यमंत्री होऊन गेले. परंतु मराठा आरक्षणा संदर्भात सामान्य माणसाची परिस्थिती सुधारली असं काम कोणीच केलं नाही, असंही यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले.

भाजपाचे नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील पुण्यात एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. या वेळी बोलत असताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. यावेळी बोलताना त्यांनी मराठा आरक्षणावरही भाष्य केलं.

देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीसाठी पहाटे चार वाजता पत्रकार परिषद घ्यायला लावली होती. अनेक मुख्यमंत्री होऊन गेले. परंतु मराठा आरक्षणा संदर्भात सामान्य माणसाची परिस्थिती सुधारली असं काम कोणीच केलं नाही, असंही यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले.

मतं मिळविण्यासाठी मराठा आरक्षण दिलं नाही तर समाजाचे कायमस्वरूपी प्रश्न मिटविन्यासाठी फडणवीस यांनी काम केलं. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबत अभ्यास केला म्हणूनच ते उच्च न्यायालयात टिकले, असेही ते म्हणाले.

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही पाठराखण केली. मराठा आरक्षणावर बोलताना मी उद्धव ठाकरे यांना दोष देत नाही. कारण तो कोविड काळ होता. सर्वोच न्यायालयात आरक्षण टिकलं नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

दुसरीकडे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दैवी शक्ती आहे. वयाच्या 27 व्या वर्षी ते महापौर होते. ज्य महापौर परिषदेचे ते अध्यक्ष होते, असंही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.