
टीव्ही असो वा चित्रपट...सेटवर अनेक लव्ह स्टोरीज सुरु होतात. एकत्र काम करताना अभिनेते-अभिनेत्री सहकलाकाराच्या प्रेमात पडतात. सेटवरुन सुरु झालेली काही नाती आजही भक्कमपणे टिकून आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जी आपल्या ऑनस्क्रीन भावाच्या प्रेमात पडली. साखरपुडा केला. पण त्यानंतर हे नातं टिकलं नाही.

आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत, तिने साखरपुडा मोडल्यानंतर बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रीच्या भावासोबत लग्न केलं. तिला एक मुलगी सुद्धा आहे. पण हे नातं सुद्धा तुटलं. घटस्फोटानंतर ही अभिनेत्री अभिनयापासून लांब गेलीय. आता गुजराण करण्यासाठी कपडे विकावे लागत आहेत.

आम्ही अभिनेत्री चारु असोपा बद्दल बोलत आहोत, जी खूप चर्चेत होती. वयाच्या 18 व्या वर्षी तिचं पहिलं लग्न झालं. पण हे नातं टिकलं नाही. 2016 साली तिने घटस्फोटाचा निर्णय घेतला. दुसऱ्या लग्नाआधी ती सहकलाकाराच्या प्रेमात पडली.

चारू असोपा आणि नीरज मालवीय एकाच शो मध्ये काम करायचे. सीरियल 'मेरे अंगने में' दोघे भाऊ-बहिणीच काम करत होते. तिथेच ते एकमेकाच्या प्रेमात पडले. बघता, बघता हे नातं साखरपुड्यापर्यंत पोहोचलं. साखरपुड्याचे फोटो आले. पण नंतर काहीतरी बिनसलं. 2017 मध्ये त्यांचा ब्रेकअप झाला. साखरपुडाही मोडला.

ब्रेकअप नंतर चारुच्या आयुष्यात राजीव सेनची एन्ट्री झाली. तो सुष्मिता सेनचा भाऊ आहे. बॉक्स क्रिकेट लीगमध्ये दोघांची ओळख झाली. प्रेमात पडले. 2019 साली लग्न केलं. दोघांना एक मुलगी झाली. मुलीच्या जन्मानंतर वर्षभरातच दोघे वेगवेगळे राहू लागले. आता दोघेही वेगळे झालेत.