
पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हॉट्सॲप चॅनेलवर आले आहेत. व्हॉट्सॲपवर नवी सुविधा सुरु केली आहे. या माध्यमातून एकतर्फी ब्रॉडकास्ट चॅनेल सुरु करू शकता. या माध्यमातून एकाच वेळी अनेक लोकांशी संवाद साधला जाऊ शकतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी निगडीत अपडेट आणि पोस्ट या चॅनेलच्या माध्यमातून मिळतील. चला जाणून घेऊयात हे फीचर कसं काम करतं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी कसा संवाद साधणार ते..

व्हॉट्सॲप चॅनेल एकतर्फी ब्रॉडकास्ट टूल आहे. अॅडमिन टेक्स्ट, फोटो, व्हिडीओ, स्टिकर आणि पोलच्या माध्यमातून संवाद साधू शकतो. या चॅनेलच्या माध्यमातून इंडियन क्रिकेट टीम आणि बॉलिवूडकर जोडले गेले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हॉट्सॲप चॅनेलवर पोस्ट केलं आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की, व्हॉट्सॲप कम्युनिटीमध्ये सहभागी होण्यास उत्सुक आहे. संवाद साधण्याच्या वाटचालीत आणखी एक पाऊल आहे. यात नव्या संसदेचा फोटो आहे.

पीएम मोदी यांच्या चॅनेलसी संपर्कात राहायचं असेल तर https://www.whatsapp.com/channel/0029Va8IaebCMY0C8oOkQT1F या लिंकवर क्लिक करा. तिथे चॅटिंगसारखं इंटरफेस दिसेल. आता त्याच्या वर असलेल्या Follow पर्यायावर क्लिक करा.

तुम्ही एखादं चॅनेल फॉलो केलं तरी तुमचा नंबर ॲडमिन किंवा इतर फॉलोअर्संना दिसणार नाही. त्यामुळे त्रास होण्याची शक्यता नाही. तसेच प्रत्येक अपडेट मिळण्यास मदत होईल.