
पंतप्रधान नरेंद्र मोदी 272 किलोमीटर लांब उधमपूर-श्रीनगर-बारामूल्ला रेल्वे लिंक पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहे. तसेच चिनाब ब्रिज आणि देशातील पहिला केबल-स्टेड अंजी ब्रिजचे लोकार्पण करणार आहे.

चिनाब रेल्वे ब्रिज 1,315 मीटर लांब आहे. जगातील सर्वात उंच हा पूल आहे. त्याची उंची 359 मीटर आहे. या पुलाच्या निर्मितीसाठी 1486 कोटी रुपये खर्च आला आहे. तसेच आठ रिश्टल स्केलपर्यंतचा भूकंप सहन करण्याची क्षमताही त्याची आहे.

चिनाब रेल्वे ब्रिजमुळे कटरा आणि श्रीनगरमधील प्रवास तीन तासांनी कमी होणार आहे. चिनाब ब्रिजवर पहिला ट्रायल रन जून 2024 मध्ये झाला होता. त्यानंतर जानेवारी 2025 मध्ये वंदे भारत ट्रेनचा ट्रायल झाला होता.

चीन ब्रिजचे भूमीपूजन सन 2003 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी केले होते. या पुलाच्या निर्मितीसाठी 22 वर्षे लागली. या पुलाचे वय 125 वर्षांपेक्षा जास्त असणार आहे. त्याचा आराखडा आणि तंत्रज्ञानाची जगभर चर्चा झाली.

बर्फवृष्टीच्या काळात काश्मीर भारतापासून वेगळा होतो. त्यामुळे त्या वेळी आप्तकालीन परिस्थितीत भारतीय सैन्यास मूव्हमेंट करता येत नव्हती. परंतु आता चिनाब पुलामुळे कोणत्याही ऋतूमध्ये काश्मीरमध्ये भारतीय सैन्यास पोहचणे सोपे होणार आहे.