CSK Coach Change : वनडे वर्ल्डकप जिंकून देणारा खेळाडू बनणार CSKचा नवा कोच, पण 20 कोटींची अट, निर्णय कोणाच्या हातात?
Chennai Super Kings : स्टीफन फ्लेमिंग यांच्या राजीनाम्यानंतर चेन्नई सुपरकिंग्सकडून नव्या कोचचा शोध सुरू आहे. अशात ऑयन मॉर्गनचं नाव चर्चेत आलं असून त्यासाठी तब्बल 20 कोटी रुपयांची फी मागितल्याची माहिती समोर आली आहे.

चेन्नई सुपरकिंग्सने पाचवेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. पण आता या टीममध्ये माठा बदल झाला आहे. टीम आता नव्या कोचसह आणि काही नवख्या खेळाडूंसह मैदानात उतरणार आहे.
कारण स्टीफन फ्लेमिंग यांनी टीमच्या कोचपदाचा राजीमाना दिला आहे. ते आता इग्लंडच्या संघाचे कोच बनले आहेत. त्यामुले सीएसकेला आता नव्या कोचची आवश्यकता आहे.
दरम्यान, आता क्रिकेटविश्वात अशीही चर्चा सुरु झाली आहे की, टीमसाठी नव्या कोचपदी ऑयन मॉर्गन याची निवड केली जाऊ शकते.
दरम्यान, कोचपदाची ऑफर स्वीकारण्यासाठी मॉर्गनने 20 कोटी मागितल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय त्याला कोचपदावर संधी देणं माहीच्या (एम एस धोनी) हातात असल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यान मॉर्गन एवढी जास्त फी का मागत आहे, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, पण खरं सांगायचं तर त्याच्याकडे आयपीएल कोचिंगचा जास्त अनुभव नाही पण लीडरशिप आणि रणनीती बनवण्यात त्याचा हातखंडा आहे. त्याने 8 वर्षे इंग्लंडचं कर्णधारपद (2014 ते 2022) भूषवलं आहे.
त्याच्याच नेतृत्वाखाली इंग्लंडने 2019 चा वनडे वर्ल्डकप जिंकला होता. दरम्यान, चेन्नईने त्यांची कोचपदी निवड केली तर ऑयन मॉर्गन आयपीएल इतिहासातील सर्वात जास्त फी घेणारा कोच बनेल. सध्या आशीष नेहरा आणि रिकी पॉन्टिंग हे दोघेच सर्वाधिक फी घेणारे कोच आहेत. ते प्रतिहंगाम 9.5 कोटी रुपये घेतात.