
आयपीएलच्या 14 व्या मोसमातील दुसरा सामना धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रिषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी या मॅचला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरुवात होणार आहे. या सामान्यानिमित्ताने या दोन्ही संघातील आकडेवारी पाहणार आहोत.

CSK vs DC 2021 Live Score Marathi | चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स लाईव्ह

दोन्ही संघांनी भारतात 18 सामने खेळले आहेत. यापैकी 13 मॅचमध्ये चेन्नईने विजय मिळवला आहे. तर दिल्लीने 5 सामन्यात विजय मिळवला आहे.

या 14 व्या हंगामातील सर्व सामने हे त्रयस्थ ठिकाणी खेळवण्यात येत आहेत. म्हणजेच कोणताही संघ हा आपल्या होम ग्राउंडवर सामने खेळणार नाही. आतापर्यंत या दोन्ही संघांमध्ये एकूण 8 वेळा त्रयस्थ ठिकाणी सामने पार पडले आहेत. यामध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी 4 सामने जिंकले आहेत.

दिल्लीचा चेन्नई विरुद्धातील 142 ही सरासरी धावसंख्या आहे. तर चेन्नईचा हाच आकडा 162 इतका आहे.

चेन्नईकडून कर्णधार महेंद्रसिंह धोनीने दिल्ली विरुद्ध सर्वाधिक 547 धावा केल्या आहेत. तर ड्वेन ब्राव्होने सर्वाधिक 14 विकेट्स मिळवल्या आहेत.

तसेच दिल्लीच्या शिखर धवनने चेन्नई विरुद्ध सर्वाधिक 309 धावा चोपल्या आहेत. तसेच अमित मिश्राने सर्वात जास्त 9 बळी घेतल्या आहेत.