छावा ते सैयारा.. 2025 मधील ब्लॉकबस्टर चित्रपट पहा ओटीटीवर

2025 हे वर्ष संपायला अवघे दोन महिने शिल्लक राहिले आहेत. वर्षभरात आतापर्यंत बरेच दमदार चित्रपट प्रदर्शित झाले. त्यापैकी काहींनी बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली. हे चित्रपट तुम्ही थिएटरमध्ये पाहू शकला नसाल, तर आता ते ओटीटीवर तुम्ही पाहू शकता.

Updated on: Nov 02, 2025 | 12:44 PM
1 / 7
विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपट यावर्षी फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने जगभरात तब्बल 808.7 कोटी रुपयांची कमाई केली असून या वर्षातील हा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 'छावा' हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

2 / 7
अहान पांडे आणि अनित पड्डा यांच्या मुख्य भूमिका असलेला 'सैयारा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाने जगभरात 575.8 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. हा चित्रपटसुद्धा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

3 / 7
2025 या वर्षांत आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट 'कांतारा : चाप्टर 1' ठरला आहे. कन्नड सुपरस्टार ऋषभ शेट्टीचा हा ब्लॉकबस्टर चित्रपट आता प्राइम व्हिडीओवर स्ट्रीम होतोय. परंतु याचा हिंदी व्हर्जन आणखी काही आठवड्यांनी ओटीटीवर येणार आहे.

4 / 7
'महावतार नरसिम्हा' या अॅनिमेटेड चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमालच केली. 300 कोटी रुपयांची कमाई केलेल्या या चित्रपटाला तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता. लहानांपासून मोठ्यांपर्यंत.. सर्वच वयोगटातील प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला होता.

5 / 7
पवन कल्याण यांचा 'ओजी' हा चित्रपटसुद्धा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. या चित्रपटाने 300 कोटी रुपयांहून अधिक कमाई करत हिट चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवलं. सध्या हा चित्रपट नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होतोय.

6 / 7
'लोका: चाप्टर 1' या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर 300 कोटी रुपयांहून अधिक कमावले होते. अत्यंत वेगळ्या विषयाचा हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता. यामध्ये कल्याणी प्रियदर्शनची मुख्य भूमिका आहे.

7 / 7
'वश: लेवल 2' हासुद्धा या वर्षातील हिट चित्रपटांपैकी एक आहे. जानकी बोडीवालाची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होतोय.