
छत्रपती शिवाजी महाराजांची जगातील सर्वात लहान रांगोळीची वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये नोंद करण्यात आली आहे.

विजय रहाटे असे रांगोळी काढणाऱ्या कलाकाराचे नाव आहे.

श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जगातील सर्वात लहान रांगोळी 3 सेमी× 3 सेमी आकाराची आहे.

ही रांगोळी साकारण्यासाठी 42 मिनिटे 37 सेकंद इतका वेळ लागला आहे.

रांगोळी कलेत काहीतरी वेगळं करुन दाखवण्याचे मी खूप मोठं स्वप्न पाहिले होते. मला स्वत:चे नाव जागतिक स्तरावर करायचे आहे. ते पूर्ण झाल्याचा आनंद माझ्यासाठी खूप मोठा आहे, अशी प्रतिक्रिया विजय रहाटे यांनी दिली.