
आजकाल लग्नासाठी योग्य जोडीदार मिळणे फारच कठीण झाले आहे. अनेक स्थळं पाहूनही काही तरुण, तरुणींना मनासारखा जोडीदार मिळत नाही. काही तरुणांना तर योग्य मुलगी कुठे शोधाही हेही समजत नाही.

दरम्यान, जगात असे एक ठिकाण आहे, जिथे लग्नासाठी चक्क बाजार भरतो. इथे लोक लोक आपल्या मुलासाठी किंवा मुलीसाठी योग्य तो जोडीदार शोधतात. हा बाजार चीनमध्ये भरतो. याला जगात मॅरेज मार्केट म्हणून ओळखले जाते.

हा लग्नाचा बाजार चीनमधील शांघाई शहरात पिपल्स पार्कवर प्रत्येक आठवड्याच्या शेवटी भरतो. येथे लोक आपल्या मुलाचा, मुलीचा फोटो, वय, उंची, पगार, नोकरी अशी माहिती असलेला एक कागद घेऊन छत्रीवर किंवा बोर्डावर लावतात आणि आपल्या मुलाला किंवा मुलीला योग्य असा जोडीदार शोधतात.

ही परंपरा 1996 साली सुरू झाली होती. आजही इथे मॅरेज मार्केटच्या रुपात लग्नासाठी जोडीदाराचा सोध घेतला जातो. चीनमध्ये साधारण चार कोटी असे पुरूष आहे, ज्यांना लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण झाले आहे.

ज्या महिला करिअर आणि पैसे कमवण्याकडे लक्ष देतात त्यांना चीनमध्ये शेंग नू म्हणजेच उरलेल्या मुली असे म्हटले जाते. त्या मुलींसाठीदेखील या बाजारात मुलाचा शोध घेतला जातो.

आता हा लग्नाचा बाजार भरवण्याचा ट्रेण्ड फक्त शांघाईपर्यंतच मर्यादित राहिलेला नाही. बिजिंग, चेंगदू, ग्वांगझो तसेच अन्य शहरात हा बाजार भरायला लागला आहे.