
सोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेली 'अजूनही बरसात आहे' या मालिकेत चित्रपटसृष्टीतले लाडके चेहरे, मुक्ता बर्वे आणि उमेश कामत मुख्य भूमिकेत दिसत आहेत. त्यांचे चाहते आणि प्रेक्षक त्या दोघांना एकत्र पाहण्यासाठी उत्सुक होतेच. आता या जोडीला जबरदस्त प्रतिसाद मिळतो आहे.

बऱ्याच कालावधीनंतर मुक्ता आणि उमेश छोट्या पडद्यावर परत आले आहेत. याआधी त्यांनी एका चित्रपटात काम केलं होतं. त्यानंतर तब्बल 8 वर्षांनंतर हे दोघं एकत्र काम करत आहेत.

आता या मालिकेला उत्सुकता वाढणारं वळण आलं आहे.

मालिकेत आदिराज मीराला का सोडून गेला असेल असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र याचं उत्तर आता मिळणार असल्याचं दिसत आहे.

आदिराजचं मीराला सोडून जाण्यामागचं कारण उलगडणार का! यासाठी पाहात रहा, 'अजूनही बरसात आहे'!