
छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) आता एका वेगळ्या टप्प्यावर पोहोचली आहे. मालिकेत आता आई-बाबा अर्थात अनिरुद्ध आणि अरुंधती देशमुख यांचा घटस्फोट झाला आहे.

कायदेशीररित्या एकमेकांपासून फारकत घेऊन आता हे दोघे वेगळे झाले आहेत. अनिरुद्धला घटस्फोट देण्याबरोबरच अरुंधतीने आता देशमुखांच्या घराचा देखील निरोप घेतला आहे.

घटस्फोटाच्या दिवशी आपलं सगळं सामान आवरून, 25 वर्षातील संसाराच्या आठवणी मागे सोडून अरुंधती आता पुढील आयुष्यातील तिच्या नव्या प्रवासाला सज्ज झाली आहे. ‘समृद्धी’ आठवणींची शिदोरी सोबत घेऊन आता आई पुन्हा एकदा तिच्या माहेरी परतली आहे.

नुकतंच या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. यात अरुंधतीला भेटायला तिची मुलं डोंबिवलीला जातात.

आता अनिरुद्धशी काडीमोड घेत, समृद्धीचा निरोप घेऊन अरुंधती आता आपल्या आईच्या घरी अर्थात माहेरी निघाली आहे. अरुंधती आता आपली आई आणि भाऊ यांच्यासोबत त्यांच्या डोंबिवलीच्या घरात राहणार आहे.

आपल्या मुलीचा 25 वर्षांचा भरला संसार मोडताना पाहून अरुंधतीच्या आईला देखील दुःख झालं. आपल्या मुलीची ही अवस्था पाहून आई देखील पूर्णपणे कोलमडून गेली होती.