
बॉलिवूड अभिनेता आमिर खान याची लेक इरा खान ही नेहमीच चर्चेत असते. गेल्या वर्षीच इरा खान आणि नुपूर शिखरे यांचा साखरपुडा हा मुंबईत पार पडलाय. चित्रपटांपासून इरा खान ही दूर आहे.

इरा खान हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. इरा देखील सोशल मीडियावर सक्रिय असते. आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबत ती नेहमीच फोटो शेअर करते.

नुकताच इरा खान हिचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे या फोटोमध्ये इरा खान ही चक्क मुंबईत रिक्षाने फिरताना दिसली आहे.

लग्झरी गाड्यांची मालकीन असलेली इरा खान ही इतक्या उन्हामध्ये रिक्षाने नेमकी का फिरत असल्याचे देखील अनेकांनी विचारले आहे. आता याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

इरा खान हिने काही दिवसांपूर्वीच बिकिनीवरील काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले होते. इरा खान हिने शेअर केलेल्या त्या फोटोनंतर तिला टार्गेटही करण्यात आले.