
बिग बॉस मराठीचा नवा सिझन सुरु झाला आहे. बिग बॉसच्या या पाचव्या सिझनच्या पहिल्याच आठवड्यात बरेच राडे पाहायला मिळाले. यंदाच्या सिझनचं वैशिष्ट्ये म्हणजे कार्यक्रमाचा होस्ट...

अभिनेता रितेश देशमुख बिग बॉस मराठीच्या या सिझनचं सूत्रसंचालन करत आहे. त्याची शैलीदेखील प्रेक्षकांना आवडत आहे. त्यांच्या सूत्रसंचालनाचं प्रेक्षक कौतुक करत आहेत.

शांत आणि संयमी असा रितेशचा स्वभाव महाराष्ट्राला आणि त्यांच्या चाहत्यांना माहिती आहे. पण बिग बॉस मराठीचं सूत्रसंचालन करत असताना तो अॅग्रेसिव्ह झाल्याचं पाहायला मिळत आहे.

बिग बॉसमधील स्पर्धक निक्की तांबोळी ही ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर आणि मराठी माणसाविषयी बोलताना दिसली. त्यानंतर महाराष्ट्रभरातून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या.

काल झालेल्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने निक्की तांबोळीला चांगलंच सुनावलं आहे. आताच्या आता मराठी माणसाची माफी माग, असं रितेश तिला सांगतो. रितेशच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक होतं आहे.