
अभिनेता सिद्धार्थ जाधव... सिद्धार्थने खास फोटोशूट केलं आहे. यलो कलरच्या आऊटफिटमधील सिद्धार्थ जाधवच्या या फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्ता होत आहे.

'यलो वाईब्ज ओन्ली' म्हणत सिद्धार्थ जाधवने हे खास फोटो शेअर केले आहेत. सिद्धार्थच्या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्याच्या लूकला दाद दिली आहे.

सिद्धार्थच्या फोटोंना नेटकऱ्यांनी पसंती दिली आहे. खूपच सुंदर फोटो आहेत. कलरही भारी आहे, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. फोटो मस्त आहेत. सुपर खतरनाक एक नंबर दिसतोय, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.

'नवरा माझा नवसाचा 2' या आगामी सिनेमात सिद्धार्थ जाधव काम करतो आहे. या सिनेमाचं डबिंगही पूर्ण झालं आहे. या सिनेमाची सिनेरसिक वाट पाहत आहेत.

सिद्धार्थ जाधवचा 'येरे येरे पैसा 3' हा सिनेमादेखील लवकरच येणार आहे. या सिनेमाचं शूटिंग सध्या सुरु आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.