
बॉलिवूड अभिनेत्री अमायरा दस्तूर (Amyra Dastur) नेहमीच तिच्या सौंदर्यामुळे ओळखली जाते. आपल्या नितळ त्वचेपासून ते सिल्की केस आणि जबरदस्त फिगरने अभिनेत्रीने अनेकांची मने जिंकली आहेत.

अमायरा ‘सेरी कॉस्मेटिक्स’, ‘फ्रेस्का जूस’, ‘मेरीको’ आणि ‘लिरिल’ यासारख्या ब्युटी केअर ब्रँडची ब्रँड अॅम्बेसेडर आहे.

तिच्या ब्रँडच्या या यादीमध्ये आता ‘सिक्रेट टेंप्टेमेशन टॅल्क’चे नाव जोडले गेले आहे.

या सर्व ब्रँड्सनी अगदी कमी कालावधीत एकामागून एक अभिनेत्रीला साईन केले आहे. अमायरामुले या ब्रँड्सना ओळख मिळाली आहे.

आपल्या ब्रँड सायनिंगविषयी बोलताना अभिनेत्री म्हणाते, "या उत्कृष्ट ब्रँडचा एक भाग होणं खरोखर खूप रोमांचक आहे. बॉलिवूड अभिनेत्रींना ब्युटी ब्रँडचा भाग असल्याचे पाहतच मी मोठी झाली आहे आणि मला हे सर्व करण्याची संधी देखील मिळते आहे. ही एक अद्भुत भावना होती, जी आजही अगदी तशीच मिळाली. 2021मध्ये माझ्यासाठी आणखी काय विशेष होणार आहे, याची मी वाट पाहत आहे."

बरेच ब्रँड अभिनेत्रींना त्यांची ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्यासाठी स्पर्धा करत असतात. अमायरा दस्तूरच्या या घायाळ करणाऱ्या सौंदर्यावर अनेक ब्युटी ब्रँड फिदा झाले आहेत.