
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतील देवकीच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेल्या अभिनेत्री मीनाक्षी राठोडने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आपण 'आई; होणार असल्याची गोड बातमी दिली आहे.

मीनाक्षीने आपला पती कैलासासोबत बेबीशॉवरचे फोटो शेअर करत 'येस वी आर' असे कॅप्शन दिले आहे. याच्या या पोस्टवर चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव सुरु आहे.

अभिनेत्री मीनाक्षी राठोड आणि अभिनेता कैलास वाघमारे या दोघानीही मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये नावाजलेल्या भूमिका साकारल्या आहेत. याबरोबरच 'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' प्रसिद्ध नाटकांमध्येही दोघांनी अंत्यत महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.

मीनाक्षीच्या 'खिसा' नावाच्या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. कैलासानेही तानाजी मालुसरे चित्रपटातही महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. दोघांनी मिळून कॉलेजमध्ये असताना अभिनय प्रवासाला सुरुवात केली होती

मीनाक्षी व कैलास सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. काही दिवसांपूर्वी वैजापूरमधील आंतरजातीय विवाहहत्या प्रकरणी लिहिलेली पोस्ट सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल झाली होती.