
बिग बॉस 14 मधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री पवित्रा पुनिया आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. आज, तिच्या वाढदिवसानिमित्त, आपण तिच्याशी संबंधित काही खास फोटो बघणार आहोत, ज्यामध्ये आपण तिची अतिशय मोहक शैली पाहू शकतो.

पवित्राच्या हॉट अवतारचे लाखो चाहते आहेत. तिनं फोटो शेअर करताच तिचे फोटो व्हायरल होत असतात.

अभिनेत्री पहिल्यांदा प्रसिद्ध टीव्ही शो 'स्प्लिट्सविला 3' मध्ये 2009 मध्ये दिसली होती. या शोमध्ये तिनं उत्तम कामगिरी केली आणि चाहत्यांची मनं जिंकली.

त्यानंतर ती 'लव्ह यू जिंदगी', 'नागिन 3' आणि 'कवच' सारख्या मोठ्या शोमध्येही दिसली.

सध्या पवित्रा एजाज खान सोबत रिलेशनशिपमध्ये आहे, हे दोघं आता मुंबईत एकत्र राहतात.

पवित्रा ही मुळची दिल्लीची आहे, तिचा जन्म 22 ऑगस्ट 1988 रोजी झाला होता.

पवित्रा पुनियानं हॉस्पिटॅलिटीमध्ये डिप्लोमा केला आहे. सोबतच तिनं या डिग्री दरम्यानच तिच्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली.

खूप कमी लोकांना माहित आहे की पवित्राचे खरं नाव नेहा सिंग आहे.