
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सोशल मीडियावर सतत विविध पोस्ट शेअर करत असते. आताही तिने खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. प्राजक्ताने पर्पल कलरच्या आऊटफिटमध्ये क्लासी फोटोशूट केलंय.

'गूगल आई' हा प्राजक्ताचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला प्राजक्ताने हा क्लासी आऊटफिट परिधान केला होता. तिच्या या लूकची चर्चा होत आहे.

एक हसतं-खेळतं, आनंदी कुटुंब... अचानक त्यांच्या या सुखी कुटुंबात एक वादळ येतं. या वादळात संपूर्ण कुटुंबाची वाताहत होते. त्यांच्या आयुष्यात हे वादळ कसं आलं. त्यातून ते बाहेर पडणार का? यात 'गूगल आई'ची कशी मदत होणार? याबाबतचा हा सिनेमा आहे.

प्राजक्ता वेगवेगळ्या स्टाईलचे कपडे परिधान करत असते. काही दिलसांआधी ग्रे कलरच्या क्लासी वनपीसमधील फोटो प्राजक्ताने शेअर केले होते. तिच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट केली आहे. किती ते गोड हसू..., अशी कमेंट प्राजक्ताच्या चाहत्याने केली आहे.

पारंपरिक वेशभूषेतील फोटोही प्राजक्ता शेअर करत असते. असेच तिचे काही फोटो.... 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत प्राजक्ताने येसूबाईंची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं.