
अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा 'फुलवंती' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात अभिनेता गश्मीर महाजनी आणि प्राजक्ताने स्क्रिन शेअर केली आहे. फार वर्षांपूर्वी गश्मीर माझा क्रश होता आणि आता मी त्याच्यासोबत काम करतेय, असं सिनेमाच्या प्रोमोशन दरम्यान प्राजक्ता म्हणाली.

मी माझ्या मनात खूप आधीच गश्मीरसोबत काम करून झालंय. खूप आधीपासून मला गश्मीरसोबत काम करायचं होतं. खरं तर ही गोष्ट कुणाला माहिती नाही. एकेकाळी तो माझा क्रश होता, असं प्राजक्ता एका मुलाखतीत सांगितलं.

गश्मीरची मी खूप मोठी चाहती होती. तो माझा क्रश होता. त्याच्या 'कॅरी ऑन मराठा' सिनेमाचा फर्स्ट डे फर्स्ट शो बघायला मी गेले होते. तेही एकटी गेली होती. तेही केवळ गश्मीरसाठी, असं प्राजक्ताने सांगितलं.

एखाद्या सिनेमाला वेळेच्या आधी मी कधीच जात नाही. पण 'कॅरी ऑन मराठा' सिनेमाला मी 10 मिनिटं आधीच जाऊन बसले होते. तेव्हापासूनच गश्मीरसोबत काम करायची इच्छा मनात होती, असं प्राजक्ताने एका मुलाखतीत म्हटलंय.

अनेकदा मनातल्या मनात मी गश्मीर महाजनीसोबत काम केलं. कधी वाटलं, या सिनेमात गश्मीरसोबत काम करेन त्या सिनेमात करेन पण अखेर तो दिवस आला आणि फुलवंती सिनेमात आम्ही एकत्र काम केलं. याचा खूप आनंद आहे, असं प्राजक्ता म्हणाली.