
अभिनेत्री प्राजक्ता माळी महाराष्ट्राची हास्य जत्राच्या टीमसोबत सिंगापूरमध्ये आहे. परदेशातून प्राजक्ताने एक इन्स्टाग्राम लाईव्ह केलं.

प्राजक्ताने सिंगापूरमधून इन्स्टाग्राम लाईव्ह केलं. यात तिने मोठी घोषणा केली आहे. ही घोषणा करताना आपल्याला प्रचंड आनंद होत असल्याचं प्राजक्ताने म्हटलं आहे.

प्राजक्ताने 'प्राजक्तराज' हा एक ज्वेलरी ब्रँड मागच्या वर्षी लाँच केला. पारंपरिक मराठमोळे दागिने या ज्वेलरी ब्रँडच्या माध्यमातून ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

या ब्रँडमध्ये एका नव्या दागिन्याची भर पडली आहे. मोकळ्या घसाची वज्रटीक आज लाँच केली आहे. या इन्स्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून प्राजक्ताने ही घोषणा केली आहे.

'प्राजक्तराज'ला एक वर्ष झालं आहे. तुम्ही सगळ्यांनी खूप भरभरून प्रेम दिलं. आज एक नवा दागिना लाँच करत आहे. सिंगापूरमधून हा दागिना लाँच करतेय, याचा अत्यंत आनंद होत आहे, असं प्राजक्ता या लाईव्हमध्ये म्हणाली.