
अभिनेत्री प्राजक्ता माळी... प्राजक्ता वेगवेगळ्या पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आताही तिने एक खास पोस्ट शेअर केलीय. तिच्या या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

मान्सून काही दिवसांवर येऊन ठेपलाय. अशातच अनेकजण ट्रीप प्लॅन करतात. प्राजक्ता माळीदेखील सध्या सुट्टी इन्जॉय करतेय. तिने खास फोटो शेअर केलेत.

प्राजक्ता सध्या 'प्राजक्तकुंज' या तिच्या रिसॉर्टमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. मालकिन 'प्राजक्तकुंज' बसलीय, मान्सूनचं स्वागत करण्यासाठी... असं म्हणत प्राजक्ताने हे फोटो शेअर केलेत.

प्राजक्ताच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केली आहे. मस्त सुट्टीचा आनंद घेते आहे, अशी एका चाहत्याने कमेंट केली. तर तू इतकी सुंदर का आहेस? पाहतच राहावं वाटतं, अशी कमेंट नेटकऱ्याने केलीय.

मागच्या वर्षी प्राजक्ताने 'प्राजक्तकुंज' हे रिसॉर्ट विकत घेतलं. कर्जतमध्ये असणारं हे अलिशान रिसॉर्ट निसर्गाच्या कुशीत वसलेलं आहे.