आयुष्यात थोडं वेड लागणं हे…; प्रिया बापटने शेअर केले ट्रीपचे खास फोटो

Actress Priya Bapat Trip Photos : अभिनेत्री प्रिया बापट सध्या सुट्टीचा आनंद घेतेय. निसर्गरम्य ठिकाणी जात प्रिया निवांत वेळ घालवते आहे. प्रिया बापटने हे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. या तिच्या ट्रीपच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्यात. पाहा खास फोटो...

| Updated on: Jun 20, 2024 | 4:36 PM
1 / 5
मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट हिला फिरायला जायला आवडतं. ती वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जात असते. आताही प्रिया एका खास ठिकाणी फिरायला गेली आहे.

2 / 5
निसर्गरम्य ठिकाणी प्रिया बापट तिची सुट्टी इन्जॉय करतेय. आपण एकट्याने वेळ घालवणं महत्वाचं आहे. स्वत: सोबत काही काळ घालवायला हवा, असं म्हणत प्रियाने हे खास फोटो शेअर केलेत.

3 / 5
निसर्गाच्या कुशीत पाण्याच्या प्रवाहात प्रिया इन्जॉय करताना दिसतेय.  याचे फोटो आणि व्हीडिओ प्रियाने शेअर केलेत. यावर तू नक्की कुठे गेली आहेस? हे लोकेशन कुठे आहे? अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्यात.

4 / 5
आराम आणि वाचन करत आजचा दिवस घालवला. मी संपूर्ण दिवस कादंबरी वाचण्यात मग्न होते. आयुष्यात थोडं वेड लागणं हे खरंच ताजेतवानं करणारं असतं, असं म्हणत वाचन करतानाचा हा फोटो प्रियाने शेअर केलाय.

5 / 5
प्रियाच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. वाचनाची आवड जपणं महत्वाचं आहे, असं तिच्या चाहत्याने म्हटलंय. तर वाचन करण्यासाठी एवढ्या लांब कोण जातं? अशी फनी कमेंट नेटकऱ्याने केलीय.