
झी मराठीवरील 'शिवा' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीला उतरतेय. या मालिकेतील शिवाचं पात्र प्रेक्षकांना भावतं आहे. या पात्रावर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत.

अभिनेत्री पूर्वा कौशिकने शिवा हे पात्र साकारलं आहे. मालिकेत डॅशिंग दिसणारी शिवा खऱ्या आयुष्यातही तितकीच ग्लॅमरस आहे. पूर्वा कौशिकने तिचे हे खास फोटो शेअर केलेत.

तुम्ही माझ्या कॅमेरा अँगलमधून फोटो पाहात आहात, असं कॅप्शन देत पूर्वाने हे खास फोटो शेअर केलेत. तिच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळतेय. मालिकेतील तिच्या कामासोबतच सोशल मीडियावरच्या फोटोंनाही पसंती मिळतेय.

यलो कलरच्या या ड्रेसमधील फोटोंना सोशल मीडियावर नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. नेटकऱ्यांनी कमेंट करत पूर्वाच्या लूकला दाद दिली आहे. खरा बोलणारा हसरा चेहरा, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.

किती गोड आहेस तू... अशीच हसत राहा, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. शिवाच्या भूमिकेसाठी तुम्ही अगदी साजेश्या आहात. माझ्या घरात तुम्ही लाडक्या झाल्या आहात, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे.