
झी मराठीवरील 'शिवा' ही मालिका प्रेक्षकांना सध्या आवडताना दिसतेय. प्रेक्षक या मालिकेला प्रेम देतात. या मालिकेत शिवा आणि आशुच्या लग्नाचा ट्रॅक सध्या सुरु आहे.

'शिवा' ही मालिकेत आता एक बदल पाहायला मिळतो आहे. शिवाचा लूक बदलला आहे. लग्नानंतर शिवा साडी नेसत आहे. तिचा हा लूक काही प्रेक्षकांना आवडला आहे. तर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे.

आधी शर्ट आणि जिन्स घालणारी शिवा आता साडीत दिसतेय. तिचा हा लूक आवडल्याचं काहींनी म्हटलं आहे. साडीत किती सुंदर दिसतीये... साडीमुळे तुझं सौंदर्य अधिक खुललं आहे, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.

तर काही चाहत्यांनी शिवाच्या या लूकवर नाराजी दर्शवली आहे. तू आधीच चांगली दिसत होतीस शिवा... साडीपेक्षा तुला शर्टच सूट करतो, असं तिच्या चाहत्याने म्हटलं आहे.

100% शिवा चांगला संसार करू शकते. पण लग्नानंतर मुलीने साडीच का नेसावी?, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर आतातरी तिच्यावर विश्वास ठेव आशु... तिने मुद्दाम तुझ्याशी लग्न नाही केलं, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.