
'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू... रिंकू राजगुरु सोशल मीडियावर फार सक्रीय असते. वेगवेगळ्या पोस्ट ती शेअर करत असते. आतीही रिंकूने खास पोस्ट शेअर केलीय.

रिंकूने घरात निवात क्षण अनुभवतानाचे फोटो शेअर केलेत. विकेंड वाईब्ज म्हणत रिंकूने हे खास फोटो शेअर केलेत. यात रिंकूच्या मुंबईतील घराची झलक दिसतेय.

रिंकूच्या फोटोंना नेटकऱ्यांनी पसंती दिलीय. 81 हजार लोकांनी रिंकूची पोस्ट लाईक केली आहे. तर कमेंट करत नेटकऱ्यांनी कमेंट केली आहे.घर खूपच सुंदर असल्याचं चाहत्याने म्हटलंय.

चांद, तारे, फुल और शबनम आपसे अच्छा कौन है?, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. ओळखलंच नाही... किती तब्येत कमी केलीस... स्वीट स्माईल, अशी एका चाहत्याने कमेंट केलीय.

तर एका चाहत्याने एक गोड तक्रार केली आहे. तुम्ही माझी बर्थडे स्टोरी मेंशन का घेतली नाही?, असं नेटकरी म्हणाला आहे. तर रेडिओ लावून पुस्तक कोण वाचतं?, अशीही कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे.