
‘आई कुठे काय करते’ मालिकेतील प्रेक्षकांची लाडकी संजना अर्थात अभिनेत्री रुपाली भोसले सध्या नवनवीन फोटोशूट शेअर करत चाहत्यांच्या मनावर राज्य करतेय.

‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या सिझनमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री रुपाली भोसले (Rupali Bhosle) सध्या ‘आई कुठे काय करते!’ मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहे. मालिकेत लग्नाचा ट्रॅक सुरू असल्यानं संजना आपल्याला पारंपारिक रुपात दिसतेय, तर सोशल मीडियावरही रूपाली मस्त नऊवारीत धुमाकूळ घालत आहे.

रुपाली नेहमीच चाहत्यांसाठी नवनवीन फोटोशूट शेअर करत असते. आता तिनं एक नवं फोटोशूट केलं आहे. आता सध्या रुपालीचे हे नऊवारी परिधान केलेले काही फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

या लूकमध्ये रुपाली कमालीची सुंदर दिसते आहे. तिचा हा लूक तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे.

‘या गोजिरवाण्या घरात’ मालिकेतून रुपालीने मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं. त्यानंतर मन उधाण वाऱ्याचे, दोन किनारे दोघी आपण, दिल्या घरी तू सुखी रहा, स्वप्नांच्या पलिकडले, कुलस्वामिनी, कुलवधू, कन्यादान, वहिनीसाहेब यासारख्या असंख्य मालिकांमध्ये तिने लहान-मोठ्या भूमिका साकारल्या. कस्मे वादे, बडी दूर से आये है, तेनालीराम यासारख्या हिंदी मालिकांमध्येही ती झळकली. अगदी ‘रिस्क’ सिनेमातील छोटेखानी भूमिकेतून तिने बॉलिवूडची दारंही ठोठावली आहेत.