
अभिनेत्री सई ताम्हणकर... सई ही मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. सईचा अभिनय प्रेक्षकांना भावतो. सईचा मोठा चाहता वर्ग आहे. 34 नेटकरी सईला इन्स्टाग्रामवर फॉलो करतात.

सई आता प्रचंड ग्लॅमरस दिसते. पण सईचे जुने फोटो तुम्ही पाहिले आहेत का? सईचा हा एक जुना फोटो... आणि दुनियादारी सिनेमाच्या वेळी सईने काढलेला ग्लॅमरस फोटो...

सईचा हा फोटो तर तुम्ही याआधी क्वचितच पाहिला असेल. सईने खूप पूर्वी केलेलं फोटोशूट आणि सईचा हा एक बालपणीचा फोटो...

दुनियादारीतील शिरीन या सईच्या पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. तु ही रे या सिनेमात सईने साकारलेलं नंदिनी हे पात्र प्रेक्षकांच्या लक्षात राहिलं.

क्लासमेट्स, टाईमप्लीज, धुरळा, कलरफुल, झकास, मंगलाष्टक वन्स मोर, सनई चौघडे, बीपी, मिडियम स्पायसी, नो एन्ट्री पुढे धोका आहे, वजनदार या सारख्या अन्य सिनेमांमध्ये काम केलं आहे. शिवाय मिमी, गजनी, हंटर या हिंदी सिनेमांमध्येही सईने काम केलंय.