
बिग बाॅस फेम शहनाज गिल ही सलमान खान याचा चित्रपट किसी का भाई किसी की जान याच्या माध्यमातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. शहनाज गिल हिला खरी ओळख ही बिग बाॅमधूनच मिळालीये.

बिग बाॅसनंतर शहनाज गिल हिच्या फॅन फाॅलोइंगमध्येही मोठी वाढ झालीये. चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना शहनाज गिल ही दिसत आहे. यावेळी एका मुलाखतीमध्ये शहनाज गिल हिने मोठे खुलासे केले आहेत.


सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट 21 एप्रिल रोजी रिलीज होतोय. या चित्रपटाकडून प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा आहेत. सलमान खान हा देखील या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करतोय.

काही दिवसांपूर्वी सलमान खान हा या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी कपिल शर्मा याच्या शोमध्ये पोहचला होता. गेल्या काही दिवसांपासून सलमान खान याला सतत जीवे मारण्याच्या धमक्या या दिल्या जात आहेत.